कॅननचा 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला शक्तिशाली EOS R5 कॅमेरा सादर!

कॅनन या प्रसिद्ध कॅमेरा निर्माता कंपनीने त्यांच्या EOS R मिररलेस कॅमेरा मालिकेत आज EOS R5R6 हे दोन नवे कॅमेरे जोडले असून यापैकी EOS R5 हा कॅमेरा चक्क 8K म्हणजे फुल एचडीच्या आठपट रेजोल्यूशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो! असं करू शकणारा हा जगातला पहिलाच इंटरचेंजेबल लेन्स कॅमेरा असल्याचं कॅननचं म्हणणं आहे! हा कॅननचा आजवरचा सर्वात शक्तिशाली मिररलेस कॅमेरा आहे. याची किंमत $3899 म्हणजे जवळपास ~२,९३,००० असणार आहे ती सुद्धा लेन्सशिवाय!

R5 मध्ये 45MP सेन्सर असून याची ISO रेंज 100-51200 इतकी आहे. याचं खास वैशिष्ट्य अर्थात यामध्ये असलेलं 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग! हा कॅमेरा 8K RAW व्हिडिओ 29.97fps 4:2:2 10bit color मध्ये रेकॉर्ड करेल. सलग रेकॉर्ड केल्यास रूम टेंपरेचरमध्ये हा २० मिनिटे लांबी असलेला 8K व्हिडिओ रेकॉर्ड करू शकेल! शिवाय uncropped 4K DCI व्हिडिओ तोसुद्धा 59.94fps मध्ये रेकॉर्ड करू शकेल.

फोटोसाठी यामध्ये 45MP सेन्सर असून याद्वारे 12fps नी फोटो काढू शकेल. या मध्ये in-body image stabilization सुद्धा आहे. कॅननच्या म्हणण्यानुसार यामध्ये असलेली Dual Pixel ऑटोफोकस सिस्टम जवळपास १०० टक्के AF Area कव्हर करू शकेल! सोबत कुत्रा, मांजर आणि पक्षी यांच्यासाठीही eye tracking ची सोय आहे!

जर तुम्हाला 8K ची गरज वाटत नसेल तर EOS R6 हा R5 पेक्षा स्वस्त पर्याय योग्य ठरेल. R5 मध्ये 20.1MP सेन्सर असून हा कॅमेरा 4K/60fps आणि 1080p/120fps मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो! याची किंमत $2499 (~१,८८,०००) लेन्सशिवाय असणार आहे.

दोन्ही कॅमेरा सध्याच्या मॉडेल्सपेक्षा बऱ्याच जास्त किंमतीचे असून कॅननने आता सोनीच्या समोर 4K ऐवजी थेट 8K मध्ये स्पर्धा निर्माण करणार असल्याचं दिसत आहे! सोनीचा सुद्धा नवा कॅमेरा लवकरच येत आहे मात्र त्यामध्ये 8K असण्याची शक्यता सध्यातरी वाटत नाही. त्यामुळे कॅनन तूर्तास कॅमेरा बाजारात एकमेव कंपनी असेल जिचा 8K रेकॉर्ड करणारा मिररलेस कॅमेरा उपलब्ध आहे!

Search Terms : Canon announces the EOS R5, an 8K-shooting pro mirrorless camera

Exit mobile version