MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

धूमकेतू उघड्या डोळ्यांनी पाहण्याची दुर्मिळ संधी : जाणून घ्या कसा पाहायचा

Sooraj Bagal by Sooraj Bagal
July 19, 2020
in News
Neowise comet in India

अनेक वर्षांनी उघड्या डोळ्यांनी पाहता येईल असा धूमकेतू पृथ्वीजवळ दिसून येत आहे. १४ जुलैपासून पृथ्वीवर वेगवेगळ्या देशात हा दिसण्यास सुरुवात झाली असून आता भारतातसुद्धा दिसू शकतो. १४ जुलैपासून रोज २० दिवस हा वायव्य दिशेला सूर्यास्तानंतर पाऊण-एक तासाने दिसू शकतो

धूमकेतू म्हणजे काय ?

धूमकेतू हे आपल्या सौरमालिकेचेच भाग असतात जे धूळ दगड आणि बर्फ यांच्या मिश्रणातून तयार होतात. यांची लांबी काही किलोमीटर्स पर्यंत असते तर हे जेव्हा सूर्याजवळ पोहोचतात तेव्हा गरम होऊन/जळून यांच्यामधून वायु आणि धूळ बाहेर पडू लागतात आणि मग यांच्यामागे धूराचं शेपूट असल्या सारखं दिसू लागतं. हे शेपूट लाखो किलोमीटर्सचंही असू शकतं!

ADVERTISEMENT

अवकाशात आता दिसत असलेला नियोवाईज (Neowise) धूमकेतूचा २७ मार्च २०२० रोजी शोध लागला असून Near-Earth Object WISE (NEOWISE) या नासाच्या टेलिस्कोप दुर्बिणीद्वारे हा शोधण्यात आला आहे. याचं तांत्रिक नाव C/2020 F3 असं आहे.

१९९७ मध्ये दिसलेल्या Hale–Bopp धुमकेतू नंतर नियोवाईज सर्वात प्रखर आणि स्पष्ट पणे दिसेल असा धूमकेतू आहे. नियोवाईज पृथ्वीवरून यानंतर तब्बल ६८०० वर्षांनीच दिसणार आहे!

हा धूमकेतू कसा पहायचा?

यासाठी आपण SkySafari नावाचं मोफत ॲप वापरणार आहोत. तुमच्या फोनची लोकेशन ऑन करा. हे ॲप डाउनलोड करा. जवळपास सायंकाळी ७ ते आठ दरम्यान या ॲपद्वारे लक्ष ठेऊन पहा.

Download SkySafari on Google Play : https://play.google.com/store/apps/details?id=com.simulationcurriculum.skysafari5
Download SkySafari on App Store : https://apps.apple.com/us/app/skysafari/id1257281849

  • आता Compass च्या आयकॉनवर क्लिक करून आजूबाजूला तुमच्या लोकेशननुसार ग्रह तारे फोनमध्ये अॅडजस्ट होत आहेत का ते पहा.
  • आता सर्च पर्याय निवडून तिथे Neowise असं टाइप करा
  • आता तुम्हाला आलेल्या यादीतून C/2020 F3 वर क्लिक करायच आहे
  • आता त्याची थोडी माहिती दिसेल आता डाव्या कोपऱ्यात खाली Locate वर क्लिक करा
  • बाणाची आयकॉन तुम्हाला धूमकेतूच्या दिशेने मार्ग दाखवत राहील त्यानुसार फोन फिरवा.
  • वायव्य (उत्तर आणि पश्चिम यांच्यामधील दिशा) इथे तुम्हाला हा कॉमेट/ धूमकेतू पाहता येईल
  • यासाठी आकाश मोकळं असेल तितकं स्पष्ट पाहता येईल. जवळपास २० मिनिटे स्पष्ट तर उर्वरित वेळ धूसर अशा स्वरूपात हा दिसेल.

या लेखासाठी वर वापरण्यात आलेला फोटो Firgun Shoja (@livefirgun) या इंस्टाग्राम यूजरच्या अकाऊंटवरून घेण्यात आला आहे. त्यांनी हिमाचल प्रदेशातून हा फोटो टिपला आहे.

From July 14, C/2020 F3, a comet discovered on March 27, will be clearly visible in the north-western sky. It will be visible after sunset for around 20 minutes for the next 20 days. People can observe it from naked eyes: Deputy Director, Pathani Samanta Planetarium #Odisha pic.twitter.com/to1ajvv7cc

— ANI (@ANI) July 12, 2020

Search Terms : How to see neowise comet? Free app to locate neowise in india neowise comet india timing

Tags: AppsCometsHow ToScienceSpace
ShareTweetSend
Previous Post

ब्लॅकमॅजिकचा आता 12K व्हिडिओ कॅमेरा : FullHD च्या १२ पट रेजोल्यूशन!

Next Post

निकॉन Z5 मिररलेस फुल फ्रेम कॅमेरा सादर

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Lensa AI

तुमच्या फोटोंद्वारे बनवा भन्नाट डिजिटल चित्रं : Lensa AI ची कमाल!

December 11, 2022
Google Play 2022 Best Apps Games

गूगल प्लेवर २०२२ मधील सर्वोत्तम ॲप्स, गेम्स जाहीर!

December 9, 2022
स्पॉटिफायच्या Spotify Wrapped यादीत पहा यावर्षीची सर्वात लोकप्रिय गाणी!

स्पॉटिफायच्या Spotify Wrapped यादीत पहा यावर्षीची सर्वात लोकप्रिय गाणी!

December 2, 2022
इंस्टाग्रामवर आता फोटो पोस्टलासुद्धा गाणी/संगीत जोडता येईल!

इंस्टाग्रामवर आता फोटो पोस्टलासुद्धा गाणी/संगीत जोडता येईल!

November 26, 2022
Next Post
Nikon Z5

निकॉन Z5 मिररलेस फुल फ्रेम कॅमेरा सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
Macbook Pro Mac Mini M2 Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

January 24, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023
Kashaba Jadhav Google

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना!

January 15, 2023
CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

January 8, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
Redmi Note 12 Series

Redmi Note 12 सिरीज सादर : आता चक्क 200MP कॅमेरा 5G सह!

January 5, 2023
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

Macbook Pro Mac Mini M2 Pro

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

January 24, 2023
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

January 16, 2023

ॲपलचे नवे मॅकबुक प्रो, मॅक मिनी उपलब्ध! आता M2 Pro & Max सह!

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स…!

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना गूगलची डूडलद्वारे मानवंदना!

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

२० कोटी ट्विटर यूजर्सचा डेटा हॅक : डेटा हॅकर्सकडून प्रकाशित!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!