ॲपल ऑनलाइन स्टोअर आता भारतात : २३ सप्टेंबरपासून होणार सुरू!

ॲपलने जाहीर केलेल्या माहितीनुसार २३ सप्टेंबरपासून त्यांचं अधिकृत ऑनलाइन स्टोर भारतात सुरू होत आहे. याद्वारे ग्राहक ॲपलची सर्व उत्पादने खरेदी करू शकतील आणि त्याबद्दल सपोर्टसुद्धा मिळवू शकतील. ॲपलच्या जगभरात असलेल्या दुकानांमध्ये मिळणारा अनुभव देत ऑनलाइन टीम मेंबर्स खरेदी करत असताना मदत करतील. याबाबत ॲपल प्रमुख टीम कुक यांनी माहिती देणारं ट्विटसुद्धा केलं आहे.

Link : www.apple.com/in/apple-store-online

ॲपलच्या या स्टोअरमध्ये खरेदीसोबत खरेदी करण्यासाठी ऑनलाइन मदत, कॉनटॅक्टलेस डिलिव्हरी, पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय, जुना फोन ट्रेड इन करण्याची सोय, आपल्या गरजेनुसार मॅकचा पर्याय निवडण्याची सोय, AppleCare+ हे सर्व उपलब्ध होत आहे.
ॲपलने ऑक्टोबर महिन्यात ग्राहकांसाठी खास ऑनलाइन सेशन्स ठेवली आहेत ज्यामध्ये फोटोग्राफी आणि म्युझिक संबंधित क्रिएटिव तज्ञ मार्गदर्शन करतील. लवकरच येणाऱ्या विविध सणांनिमित्त काही ठराविक उत्पादनांवर (उदा. AirPods) आपल्या आवडीची इमोजी किंवा मजकूर कोरून मिळेल! यासाठी मराठी सह सहा भारतीय भाषा उपलब्ध असतील!

ॲपल इंडिया ऑनलाइन स्टोअरमध्ये उपलब्ध सुविधा

Exit mobile version