ॲपलचे ६० हजार रुपयांचे नवे हेडफोन्स : AirPods Max

गेले काही दिवस सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत ॲपलने त्यांचे नवे हेडफोन्स सादर केले असून याचं नाव AirPods Max (एयरपॉड्स मॅक्स) असं असणार आहे. याची किंमत कालपासून ट्रेंडिंग विषय ठरली आहे. भारतात हे हेडफोन्स ५९,९०० रुपयात मिळणार आहेत! ॲपलचे हे पहिलेच ओव्हर द इयर हेडफोन्स असून यामध्ये अॅक्टिव नॉइस कॅन्सलेशन (ANC), Spacial Audio, High-Fidelity Audio अशा सुविधा आहेत.

यामध्ये नॉइस कॅन्सलेशन म्हणजे बाहेरील आवाज बंद करण्याची सुविधा आहे. यासाठी बाहेर तीन मायक्रोफोन आणि आत एक अतिरिक्त व ANC साठी आठ (दोन शेयर केले जातील) असे एकूण नऊ माइक दिले आहेत. याची बॅटरी लाइफ जवळपास २० तास असेल असं ॲपलने सांगितलं आहे. पाच मिनिटांच्या चार्जवर १.५ तास ऐकता येईल! नियंत्रण करण्यासाठी ॲपल वॉचप्रमाणे क्राऊन देण्यात आला आहे. याद्वारे आवाज कमी जास्त, सिरी अॅक्टिवेट करणे, कॉल्सना उत्तर देणे अशा गोष्टी करता येतील. हे हेडफोन्स पाच रंगात उपलब्ध होत आहेत.

सध्या बाजारात उपलब्ध सोनी, बोस अशा कंपन्याचे यापेक्षा उत्तम पर्याय यापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत. असं असताना ॲपलने सवयीनुसार याची किंमत अपेक्षेपेक्षा बरीच जास्त ठेवली आहे असं मत अनेकांनी मांडलं आहे. इतरांनी याच्या किंमतीत इतर किती गोष्टी किती घेता येतील हे सांगताना प्लेस्टेशन, एक्सबॉक्स यांची उदाहरणे दिली आहेत!

https://youtu.be/FXI_-OesT3A
Exit mobile version