शेयरचॅट कंपनीचं व्हॅल्यूएशन आता 14905 कोटींहून अधिक!

भारतीय कंटेंट शेयरिंग प्लॅटफॉर्म शेयरचॅटने नव्याने उभ्या केलेल्या भांडवलामधून ३७४१ कोटी जोडले आहेत आणि यामुळे कंपनीचं व्हॅल्यूएशन (मूल्यांकन) तब्बल १४९०५ कोटी रुपये म्हणजे 2 बिलियन डॉलर्सहून अधिक झालं आहे. नव्याने गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांमध्ये Snap, Twitter, Tiger Global यांचा समावेश आहे.

नव्या फंडिंगमुळे ही कंपनी आता Unicorn Club मध्ये सहभागी झाली आहे. हा क्लब म्हणजे अशा स्टार्टअप कंपन्या ज्यांचं व्हॅल्यूएशन 1 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त झालं आहे. गेल्या काही दिवसात बऱ्याच कंपन्या या क्लबमध्ये आल्या आहेत.

हा फंडिंग राऊंड अमेरिकन venture capital कंपनी Lightspeed venture Partners आणि Tiger यांच्या सहभागाने पार पडला असं शेयरचॅटने सांगितलं आहे. या लाइटस्पीड व्हेंचर कंपनीचे संस्थापक रवी म्हात्रे आहेत. भारतीय स्टार्टअपममध्ये बाहेरच्या गुंतवणूकदारांची इच्छा वाढत असल्याचं या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलं आहे. या कंपन्या स्वतः भारतात त्यांची सेवा देण्यापेक्षा आधीच उपलब्ध सेवांमध्ये गुंतवणुक करत आहेत.

या नव्याने मिळालेल्या कॅपिटलद्वारे आम्ही अधिक ताकदीने आमच्या सेवेचे वापरकर्ते वाढवण्यासाठी प्रयत्न करू असं शेयरचॅटचे प्रमुख अंकुश सचदेव यांनी सांगितलं आहे. शेयरचॅटचे सध्या १६ कोटी यूजर्स आहेत.

Moj नावाच्या App चीही सुरुवात यांनीच केली असून टिकटॉकला एक चांगला भारतीय पर्याय या द्वारे दिला आहे. त्याचेही आता १२ कोटी यूजर्स आहेत!

शेयरचॅट डाउनलोड लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=in.mohalla.sharechat

Exit mobile version