MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

e-RUPI सादर : कॅशलेस पेमेंटसाठी नवा एसएमएस व्हाऊचर पर्याय!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
August 2, 2021
in News
eRUPI

आज दुपारी ४.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत या सेवेची सुरुवात करण्यात आली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) यांनी DFS, NHA, MoHFW अशा सरकारी विभागांसोबत भागीदारी करून काही पार्टनर बँकासह ही सेवा विकसित केली आहे. e-RUPI हे एक QR कोड किंवा SMS मेसेज स्ट्रिंग आधारित इ व्हाऊचर असून हे मोबाइलमध्ये पाठवण्यात येईल.

e-RUPI (ई रूपी) म्हणजे काय ?

e-RUPI हे एकदा वापरता येईल असे डिजिटल व्हाऊचर आहे जे आपण कोणत्याही कार्डशिवाय, कोणत्याही पेमेंट ॲपशिवाय किंवा इंटरनेट बँकिंग शिवाय वापरू शकता. काही संस्था किंवा सरकारतर्फे निधी लाभार्थ्यांना द्यायचा असतो तेव्हा e-RUPI चा वापर करून SMS किंवा QR कोड द्वारे पाठवण्यात येतील.

ADVERTISEMENT

ओळख पटवण्यासाठी तुमच्या मोबाइल क्रमांकाचा वापर केलेला असेल. (फोन स्मार्ट नसला तरी चालेल). ओळख पटल्यावर संबंधित बँकेला सरकार किंवा त्या त्या संस्थेकडून व्हाऊचर्स दिली जातील. ते व्हाऊचर QR कोड किंवा एसएमएस दाखवून फक्त आणि फक्त तुम्हालाच मिळू शकेल. या अंतर्गत दिलेलं एक व्हाऊचर एकदाच वापरता येईल.

यामुळे अनुदान वाटपावेळी निधी वरून खाली येईपर्यंत होणारी गळती काही प्रमाणात का होईना थांबण्यास मदत होईल. आयुष्यमान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजना, औषधे आरोग्य उपचार आणि अन्नधान्य अनुदान योजनासारख्या अनेक सरकारी व खासगी संस्थासुद्धा थेट लाभार्थ्यांना पैसे देण्यासाठी याचा वापर करणार आहेत.

सोप्या शब्दात सांगायचं तर हे काही वर्षांपूर्वी फोनसाठी ज्याप्रकारे कुपन द्वारे रीचार्ज केले जायचे तशा प्रकारचं व्हाऊचर म्हणता येईल. ठराविक रक्कम सरकार किंवा संस्थेतर्फे त्या व्हाऊचरवर जोडलेली असेल ती आपण आपला फोन घेऊन जिथे वापरायची आहे तिथे जाऊन तुमच्या फोनमध्ये आलेल्या QR/SMS कोड स्कॅन करायचा की झालं पेमेंट!

व्यवसायांना होणारा फायदा
  • व्यवसाय त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी हा पर्याय निवडू शकतात.
  • थेट व्यवहार असेल आणि प्रत्यक्ष फिजिकल देणं होणार नाही त्यामुळे पैसे वाचतील.
  • Voucher redemption can be tracked by the issuer व्हाऊचर वितरणाची नोंद ठेवता येईल.
  • वेगवान, सुरक्षित आणि कॉनटॅक्टलेस व्हाऊचर वितरण
हॉस्पिटलना होणारा फायदा
  • सोपा आणि सुरक्षित व्हाऊचर व्हेरीफीकेशन कोडमार्फत देण्यात येईल.
  • कटकटीशिवाय पेमेंट घेता येईल : कॅश/कार्डची गरज नाही
  • व्हाऊचर Redeem करणं सोपं : रक्कम आधीच ठरवलेली असल्यामुळे अडचणी कमी
ग्राहकांना होणारा फायदा
  • संपर्कविरहित (Contactless) प्रिंट घेऊन जावं लागणार नाही.
  • २ स्टेपमध्येच Redeem करता येईल.
  • सुरक्षित : लाभार्थ्यांना वैयक्तिक माहिती द्यावी लागणार नाही त्यामुळे गोपनीयता जपली जाईल.
  • बँक अकाऊंट किंवा पेमेंट ॲप किंवा कार्ड अशा कशाचीही गरज नाही.

e RUPI मध्ये सहभागी बँका : Axis Bank, Bank of Baroda, Canara Bank, HDFC Bank, ICICI Bank, Indusind Bank, Indian Bank, Kotak Bank, Punjab National Bank, State Bank of India, Union Bank of India

e-RUPI मध्ये सहभागी हॉस्पिटल्स : पुढील लिंकवर पीडीएफमध्ये पाहू शकता : https://www.npci.org.in/PDF/npci/e-rupi/live-hospitals.pdf

The launch of e-RUPI is in line with our efforts to make India a leader in Fintech and leverage technology to boost 'Ease of Living.' pic.twitter.com/NGsWfJepZX

— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2021

Search Terms : What is e rupi how to get e rupi how to redeem e rupi e rupi benefits in marathi

Tags: eRUPIGovernmentNPCIPayments
ShareTweetSend
Previous Post

टेलिग्रामचं नवं अपडेट : आता एकावेळी १००० लोक व्हिडिओ कॉल पाहू शकणार!

Next Post

आता कोविड लसीकरण सर्टिफिकेट व्हॉट्सॲपवर मिळवा!

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023
भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

December 29, 2022
VPN India Policy

भारत सरकारचा VPN कंपन्यांना युजर्सचा डेटा साठवून त्याची माहिती देण्याचा आदेश!

May 5, 2022
Next Post
आता कोविड लसीकरण सर्टिफिकेट व्हॉट्सॲपवर मिळवा!

आता कोविड लसीकरण सर्टिफिकेट व्हॉट्सॲपवर मिळवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023
भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

March 27, 2023
इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

March 25, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

March 29, 2023
Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

March 29, 2023

आता UPI पेमेंट केल्यावर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागणार का?

Global UA Day : आयटी मंत्रालयातर्फे कार्यक्रम : मराठीटेकचाही सहभाग!

भारताचं सर्वात मोठं रॉकेट LVM3 प्रक्षेपण : इस्रोची यशस्वी कामगिरी!

इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!