ॲपलचं उपकरणे पुसण्याचं कापड : किंमत फक्त १,९०० रुपये !

होय तुम्ही बरोबरच वाचलंत. आयफोन्स, आयपॅड, मॅकबुक बनवणाऱ्या या कंपनीने ही उपकरणे पुसण्यासाठी एक कापड (Polishing Cloth) उपलब्ध करून दिलं आहे ज्याची किंमत तब्बल १९०० रुपये आहे! या प्रीमियम मायक्रोफायबर क्लॉथची चर्चा सध्या इंटरनेट जगतात सुरू आहे! एव्हढ्या किंमतीत तुम्हाला या कापडाचा फक्त एक नग मिळणार आहे!

कंपनीने या कापडावरसुद्धा चक्क EMI चा पर्याय उपलब्ध करून दिला असून २२४ रु दरमहा असा EMI सुरू होतोय. कोणत्याही अर्थाने या कापडाच्या किंमतीचं समर्थन करता येत नाही इतकी जास्त याची किंमत ॲपलने ठेवली आहे. या क्लॉथबद्दल ॲपलने पुढील माहिती दिली आहे “Made with soft, non-abrasive material, the Polishing Cloth cleans any Apple display, including nano-texture glass, safely and effectively.”

हे खरेदी करायचंच असेल तर लिंक : https://www.apple.com/in/shop/product/MM6F3ZM/A/polishing-cloth

तुम्ही ॲमेझॉन/फ्लिपकार्ट किंवा तुमच्या घराजवळच्या दुकानातून मायक्रोफायबर कापड आणू शकता ज्यामध्ये ३००-४०० रुपयात तुम्हाला अनेक नग असलेला पॅक मिळतो! आता त्या कापडामध्ये आणि या पॅकमधील कापडाच्या गुणवत्तेत थोडा फरक असला तरी एका कापडासाठी १९०० रुपये द्यावा एव्हढा तर नक्कीच नसेल.

यापूर्वीही Apple Mac Pro Wheels Kit आणलं होतं ज्याची किंमत तब्बल ६९,९०० रुपये आहे तुम्ही म्हणाल या किटमध्ये काय आहे तर ॲपलच्या कम्प्युटरच्या कॅबिनेटची फक्त चार चाकं मिळतील त्यांची किंमत ॲपलने सत्तर हजार ठेवली आहे! याचीच जर चाकांऐवजी एका जागी ठेवता येतील असं feet Kit घेतलं तर त्याची किंमत २९९०० आहे.

Lightning to 3.5mm Audio Cable ची किंमत ३५०० रुपये, USB C 1m केबल १९०० रुपयांना तर Type C to 3.5mm audio jack adapter ची किंमत ९०० रुपये एव्हढी ठेवण्यात आली आहे. आता यासाठी बाहेरच्या कंपन्याचे पर्याय असले तरी काही गोष्टी ॲपलच्याच असल्या तरच त्यामधील सर्व सोयी वापरता येतात.

Exit mobile version