GTA 6 चा डेव्हलपर्स गेमप्ले हॅकरकडून लीक : गेमिंग विश्वात खळबळ!

ग्रँड थेफ्ट ऑटो म्हणजेच GTA या सर्वात प्रसिद्ध गेम मालिकेमधील पुढील गेम GTA 6 सध्या डेव्हलप केली जात असून अजून बऱ्याच वर्षानी ती प्रत्यक्ष खेळण्यासाठी उपलब्ध होईल मात्र काल एका हॅकरने GTA 6 डेव्हलपर्सच्या अंतर्गत Slack अकाऊंटला हॅक करून या गेमच्या चाचणी सुरू असतानाचे चक्क ९० व्हिडिओ GTAForums या साईटवर पोस्ट केले आहेत! यामुळे या लीकला गेमिंग क्षेत्रातील सर्वात मोठा लीक म्हटलं जात आहे!

हे लीक झालेले व्हिडिओ आता यूट्यूब, ट्विटर, रेडिट अशा सर्व माध्यमांवर आपलोड केले जात असून यामुळे GTA तयार करणारी कंपनी Rockstar Games आणि Take Two Interactive या मोठा धक्का बसला आहे. त्यांनी हे व्हिडिओ कॉपीराइट स्ट्राइक करून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे.

लीक झालेल्या फुटेजमधून यावेळी प्रथमच गेममध्ये एक मुख्य स्त्री पात्र आणण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या लुसिया नावाच्या कॅरक्टरचे गेमप्ले टेस्टिंग फुटेज बऱ्यापैकी दिसत येत आहे.

गेमर्सना यामुळे GTA 6 ची कल्पना आली असली तरी गेमच्या डेव्हलपर्सना मात्र यामुळे मोठा मनस्ताप होणार आहे. यामुळेच यासंबंधित स्क्रीनशॉट, व्हिडिओ असलेल्या गोष्टी ब्लॉक केल्या जात आहेत. इतर कंपन्यांचे डेव्हलपर्ससुद्धा त्यांना ट्विट करून त्यांचा सपोर्ट जाहीर करत आहेत.

यापूर्वी आलेल्या GTA V साठी डेव्हलपिंग आणि मार्केटिंगचा मिळून तब्बल २१०० कोटी रुपये खर्च रॉकस्टारने केला होता. मात्र ज्यावेळी ही गेम खरेदी करण्यास उपलब्ध झाली तेव्हा अवघ्या तीन दिवसातच जवळपास ८००० कोटी रुपये कमावले होते इतकी ही गेम लोकप्रिय झाली होती! २०१३ मध्ये ही गेम उपलब्ध झाली होती. आता त्यानंतर पुढील गेम GTA 6 असणार आहे. या आकडेवारीवरून रॉकस्टारसाठी ही नवी गेम आणि त्यामधील डेव्हलपमेंट किती महत्वाची आहे याचा अंदाज येईल.

अपडेट : रॉकस्टार गेम्सने आता याबद्दल ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

Exit mobile version