Skyroot च्या Vikram-1 या भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण!

Skyroot Vikram 1

भारतातील खासगी अंतराळ क्षेत्रासाठी १८ जुलै हा ऐतिहासिक दिवस ठरला. हैदराबादस्थित Skyroot Aerospace च्या Vikram-1 या भारतातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेटने यशस्वी उड्डाण करत अनेक पेलोड पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवले. यामुळे भारताच्या खासगी स्पेस टेक उद्योगासाठी हा एक मोठा टप्पा ठरला आहे.

स्कायरूट एयरोस्पेसने १८ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून Vikram-1 चे यशस्वी प्रक्षेपण केले. हे भारतात पूर्णपणे खासगी कंपनीने विकसित केलेले आणि कक्षेत पोहोचलेले पहिले ऑर्बिटल रॉकेट ठरले. या मोहिमेला “Mission Aagaman” असे नाव देण्यात आले होते.

याआधी २०२२ मध्ये Skyroot ने Vikram-S या Suborbital रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. मात्र Vikram-1 ही त्यापेक्षा मोठी झेप मानली जाते, कारण या रॉकेटने पृथ्वीच्या कक्षेत payload यशस्वीपणे पोहोचवले.

Vikram-1 हे Small Satellite Launch Vehicle म्हणून विकसित करण्यात आले आहे. हे सुमारे २२ मीटर उंच असून Low Earth Orbit मध्ये ३५० किलोग्रॅमपर्यंत payload नेण्याची क्षमता आहे. या रॉकेटमध्ये Solid Fuel स्टेजेससह Liquid Propulsion असलेला वापरण्यात आलं आहे. तसेच भारतात विकसित करण्यात आलेल्या 3D Printed Engine सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही यात वापर करण्यात आला आहे.

Mission Aagaman अंतर्गत Vikram-1 ने भारत आणि परदेशातील अनेक Technology Demonstration Payload कक्षेत पोहोचवले. यात Skyroot चा स्वतःचा SCOPE Payload तसेच Grahaa Space, Cosmoserve Space आणि जर्मनीतील DCUBED यांसारख्या संस्थांचे payload देखील होते. पहिल्याच प्रक्षेपणातील तांत्रिक कारणांमुळे त्यांचे सर्वच payload अपेक्षेप्रमाणे deploy करता आले नाहीत. मात्र त्याचा पुढील उड्डाण करतेवेळी अभ्यास म्हणून नक्कीच उपयोग होईल.

२०२० मध्ये भारत सरकारने खासगी कंपन्यांसाठी Space Sector खुला केला. त्यानंतर अनेक भारतीय स्पेस स्टार्टअप्स पुढे आले. Vikram-1 चे यशस्वी प्रक्षेपण हे त्या निर्णयाचे मोठे यश मानले जात आहे. यामुळे भारत आता खासगी कंपन्यांमार्फत उपग्रह प्रक्षेपण सेवा देणाऱ्या निवडक देशांच्या यादीत अधिक मजबूतपणे उभा राहिला आहे. जागतिक व्यावसायिक लॉंच मार्केटमध्ये भारतीय कंपन्यांसाठीही नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.

अंतराळ मोहिमा म्हणजे केवळ वैज्ञानिक यश नाही. भविष्यात स्वस्त सॅटेलाइट लॉंच, जलद संपर्क सेवा, नॅव्हिगेशन, Weather Monitoring, शेती आणि Earth Observation यांसारख्या अनेक सेवांमध्ये याचा फायदा होऊ शकतो. तसेच भारतीय स्पेस स्टार्टअप्ससाठी जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करण्याची मोठी संधी निर्माण होईल.

Exit mobile version