मानवाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रवास करणाऱ्या Voyager 1 ने आज एक नवा इतिहास रचला आहे. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३:४६ वाजता (भारतीय वेळेनुसार) Voyager 1 अंतराळयान पृथ्वीपासून तब्बल 1 Light-Day किंवा एक प्रकाश दिवस किंवा २५.९ अब्ज किलोमीटर दूर पोहोचलं आहे. म्हणजे प्रकाशाला २४ तासांत जितकं अंतर कापता येतं, तितक्या अंतरावर हे यान आता पोहोचलं आहे. आजपर्यंत मानवाने बनवलेली कोणतीही वस्तू इतक्या लांब गेलेली नाही.
Voyager 1 ला हा टप्पा गाठायला तब्बल ४९ वर्षे, २ महिने आणि ११ दिवस लागले आहेत. हे यान १९७७ मध्ये लाँच झालं होतं. आता ते पृथ्वीपासून जवळपास १६ अब्ज मैल म्हणजेच २६ अब्ज किलोमीटर दूर आहे. ते ताशी ३८००० मैल वेगाने Interstellar Space मध्ये प्रवास करत आहे. इतक्या अंतरामुळे आता त्याचा सिग्नल पृथ्वीवर यायला तब्बल २४ तास लागतात. म्हणजे आज नासाने पाठवलेला संदेश त्याला उद्या मिळणार आणि त्याचं उत्तर परवा आपल्याला मिळणार.
हे यान आता सूर्यमालेच्या बाहेर, म्हणजे Interstellar Space मध्ये आहे. तरीही त्याचे Instruments अजूनही काम करत आहेत आणि तिथली माहिती पृथ्वीवर पाठवत आहेत. Voyager 1 आता AC +79 3888 नावाच्या ताऱ्याच्या दिशेने जात आहे, जो पृथ्वीपासून १७ प्रकाशवर्षांपेक्षा जास्त दूर आहे.
Voyager 1 बद्दल महत्त्वाच्या गोष्टी
- लाँच: ५ सप्टेंबर १९७७ नासाकडून
- अंतर: पृथ्वीपासून १ प्रकाश दिवस (1 Light-Day) म्हणजे २५.९ अब्ज किलोमीटर
- वेग: ताशी ३८००० मैल (६१००० किमी/तास)
- सिग्नल वेळ: एका बाजूला संदेश जायला २४ तास लागतात
- Golden Record: यात पृथ्वीवरचे आवाज, संगीत आणि फोटो आहेत, जेणेकरून परग्रहवासीयांना आपली ओळख कळावी
NASA ने या ऐतिहासिक क्षणासाठी जगभरातल्या लोकांना “Shine a Light” मोहिमेत सहभागी व्हायला सांगितलं होतं. Voyager 1 हा फक्त एक Spacecraft नाही, तर मानवाच्या जिज्ञासेचं प्रतीक आहे. ४९ वर्षांनंतरही ते अजूनही आपल्याशी बोलतंय, हेच खरं आश्चर्य आहे.
