सॉफ्टवेअर्स

५ उत्कृष्ट व्हिडीओ कन्व्हर्टर

अगदी साध्या हँडसेटवरही व्हिडीओ प्लेयर आल्याने मोबाइलवर संपूर्ण चित्रपट पाहणाऱ्यांचीही संख्याही  भरपूर. एकीकडे घरातल्या टीव्हीची स्क्रीन साइज वाढत असताना मोबाइलवर चित्रपट पाहणारेही वाढत  आहेत .  प्रामुख्याने नोकरीसाठी खूप मोठा प्रवास करावे लागणारे , काहीकामानिमित्त एकटे राहणाऱ्यांची संख्या  यामध्ये जास्त आहे. मात्र सध्याच्या काळात व्हिडीओचे विविध प्रकार उपलब्ध झाल्याने प्रत्येक फॉरमॅट  तुमच्या व्हिडीओ प्लेयरमध्ये प्ले होईलच असे नाही . त्यासाठी ही काही व्हिडीओ कन्व्हर्टर ... एमपीईजी स्ट्रीमक्लिप  विंडोज आणि मॅकसाठी उपलब्ध असलेला एक चांगलाव्हिडीओ प्लेयर , एडिटर आणि कन्व्हर्टर आहे . यामध्ये सर्व फॉरमॅट मधल्या फाइल प्ले तर होतातच पण मोफत उपलब्ध असलेल्या या सॉफ्टवेअरमधील कन्व्हर्ट  करण्याचा स्पीडही चांगला आहे . व्हिडीओ कन्व्हर्जनसाठी उपलब्ध असलेले हे अॅप नवे नसले तरी यात अगदी सहज ,सोप्या पद्धतीने , कुठल्याही तक्रारी शिवाय व्हिडीओ कन्व्हर्ट करता येतो .  फॉरमॅट फॅक्टरी  भरपूर फीचर्स उपलब्ध असलेला व्हिडीओ फॉरमॅटिंगचा मोफत उपलब्ध असलेला हा आणखी एक पर्याय आहे .याचा इंटरफेस थोडा गोंधळात टाकणारा असला तरी यामध्ये कन्व्हर्जनचे शेकडो पर्याय मिळतात आणि कन्व्हर्टझालेले सर्व व्हिडीओ एकसारखेच वाटतात . यामध्ये खराब झालेला ऑडिओ - व्हिडीओ दुरूस्त करण्याचीही सोयआहे . स्वतंत्रपणे मोबाइलसाठी किंवा डीव्हीडीसाठीही व्हिडीओ कन्व्हर्ट करण्याचा पर्याय यात आधीपासूनचउपलब्ध आहे .  हँडब्रेक  हँडब्रेकचे मूळ कामच व्हिडीओ कन्व्हर्जन आणि ट्रान्सकोडिंग आहे . याव्यतिरिक्तही अनेक ऑप्शन्स यामध्येउपलब्ध आहेत . पण यावर कन्व्हर्ट केलेला व्हिडीओ कुठलीही स्क्रीन , कुठल्याही डिव्हाइसवर सहज प्ले होतो .विंडोज , ओएस आणि लिनक्स अशा तिन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले हे एक मोफत सॉफ्टवेअर आहे .  फ्रीमेक व्हिडीओ कन्व्हर्टर  नावाप्रमाणे मोफत असलेल्या या कन्व्हर्टरमध्ये अनेक आकर्षक ऑप्शन अंतर्भूत आहेत . २००हून अधिक व्हिडीओफॉरमॅटला सपोर्ट करणारा हा कन्व्हर्टर तुम्हाला माहिती असलेल्या जवळपास सर्व फॉरमॅटचे व्हिडीओ कन्व्हर्टकरतो . अगदी ऑनलाइन व्हिडीओ एमपी३मध्येही . यामध्ये आयओएस , अँड्रॉइड डिव्हाइस , टॅबलेट्स , गेमकन्सोल आणि इतर अनेक डिव्हाइससाठी सुरुवातीपासूनच सेटिंग्ज देण्यात आल्या आहेत . त्या नको असतील तरस्वतःही सेटिंग्ज तुम्ही निर्माण करू शकतात .  सुपर  सुपर हा एक चांगला व्हिडीओ कन्व्हर्टर असला तरी त्याला असलेल्या रेटिंग तितक्याशा चांगल्या नाहीत . पणएकदा का वापरण्याची सवय झाली की मग दुसरा कुठला कन्व्हर्टर वापरण्याची इच्छा होणार नाही . यामध्येउपलब्ध असलेल्या फिचर्सची यादी पानभर असली तरी यात इतक्या प्रकारचे व्हिडीओ कन्व्हर्ट होऊ शकतात कीअतिरिक्त फिचर्सची गरज पडणार नाही . तुम्हाला तुमचा व्हिडीओ पूर्ण नियंत्रणात हवा असेल तर यासारखामोफत कन्व्हर्टर नाही . 

‘सॅमसंग’, ‘मोझिला’चे नवे ब्राउजर : लवकरच ‘सर्वो’ ब्राउजर लाँच करणार

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनातील अग्रणी 'सॅमसंग' आणि ब्राउजरच्या दुनियेतील 'मोझिला' यांच्यातर्फे संयुक्तपणे नवे वेब ब्राउजर सादर करण्यात येणार आहे. 'सर्वो' या नावाने...

स्कायड्राइव्हचं ऑफिस : मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५

एमएस ऑफिस आणि कम्प्युटर यांचे एक अनोखे नाते . परंतु मध्यंतरीच्या काळात ओपन ऑफिस आणि गुगल डॉक यांनी मायक्रोसॉफ्टला शह देण्याचा प्रयत्न केला . तो प्रयत्नतितकासा यशस्वी झाला नसला तरी मायक्रोसॉफ्टला या दोन्ही उत्पादनांतील सुविधांचा विचार करून एमएस ऑफिसमध्ये बदल करणे क्रमप्राप्त झाले . ऑफिस २०१०मध्ये पूर्वीपेक्षा अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या .मात्र त्याही पलीकडे जाऊन काही सुधारणा आवश्यक होत्या म्हणून मायक्रोसॉफ्टने नुकतेच ऑफिस ३६५ लाँचकेले आहे . यामध्ये वर्ल्ड , एक्सेल , पॉवर पॉइंट , वन नोट , आऊटलूक , पब्लिशर अॅण्ड अॅक्सेस याचबरोबर २०जीबीपर्यंतचा स्कायड्राइव्ह स्टोअरेज मिळणार आहे .  मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं हे व्हर्जन आपल्याला मासिक किंवा वार्षिक सबस्क्रिप्शन भरून वापरू शकतो . याचावापर आपण एकावेळी पाच कम्प्युटर्स आणि पाच मोबाइल्समध्ये वापरू शकतो . आजपर्यंत ऑफिसची अशाप्रकारची कोणतीही सुविधा नव्हती . मायक्रोसॉफ्ट वेब अॅपच्या माध्यमातून आपण हे ऑफिस वापरू शकतो .याचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला मायक्रोसॉफ्ट आऊटलूक ही नवी मेल सुविधाही वापरता येणार आहे . तसेच मायक्रोसॉफ्टच्या वन नोट या नवीन सुविधेचा वापरही या ऑफिसच्या माध्यमातून करता येईल . वन नोट म्हणजे आपण आपली कामे यामध्ये स्टोअर करून ठेऊ शकतो . तसेच काही वाक्य जी आपण नेहमी आपल्या लिखाणात वापरत असतो ती वाक्यही सेव्ह करून ठेवता येतील .            ऑफिसच्या या व्हर्जनची आणखी एक खासियत म्हणजे यामध्ये आपल्याला स्कायड्राइव्ह वापरायला मिळणार आहे . या स्कायड्राइव्हमध्ये आपल्याला २० जीबीपर्यंतचा डेटा स्टोअर करता येणार आहे . यासाठी आपल्याला वेगळे पैसे मोजावे लागणार नाहीत . ते आपल्या ऑफिसच्या पॅकेजमध्येच मिळते . सध्या याचे ट्रायल व्हर्जन ३० दिवसांसाठी मोफत उपलब्ध आहेत . यापुढे येणाऱ्या विंडोज८ च्या सर्व कम्प्युटर्सवर ऑफिस ३६५ इंस्टॉल अॅप्लिकेशन म्हणून असेल . ऑफिसच्या या व्हर्जनमध्ये आपल्याला थर्ड पार्टी अॅप्स वापरता येणार आहे . यामध्ये पीडीएफ हे सर्वात उपयुक्त अॅप वापरता येईल . यामध्ये विंडोज७ प्रमाणेच आपण फाइल पीडीएफ फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतो . याशिवाय लवकरच यामध्ये भारतीय युजर्सना उपयुक्त ठरतील असे रिड अॅण्ड राइटचे २०० अॅप्स येतील , असे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे . यामध्ये ऑफिसहोम , स्टुडंट आणि प्रिमियम असे तीन व्हर्जन्स उपलब्ध आहेत .

इंटरनेट एक्स्प्लोररची दहावी आवृत्ती पास

नोव्हेंबर महिना वेब ब्राऊजर्सच्या स्पर्धेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरला आहे . या महिन्यात तीन बड्या कंपन्यांनी आपल्या ब्राऊजर्सचया नवीन आवृत्या बाजारात आल्या आहेत . यात इंटरनेट एक्स्प्लोररची १०वी आवृत्ती मॉझिला फायरफॉक्स १७ आणि गुगल क्रोम २३ यांचा समावेश आहे . यात इंटरनेट एक्स्प्लोररने बाजी मारली असून गुगल क्रोमला मात्र उतरती कळा लागली आहे .  ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एक्स्प्लोररच्या डाऊनलोडिंगमध्ये ० . ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर फायफॉक्सच्या डाऊनलोडिंग ० . ४५ टक्के घसरले आहे . तर क्रोमचे डाऊनलोडिंग तब्बल १ . ३१ टक्क्यांनी घसरले आहे . आश्चर्याची बाब म्हणजे सफारी या ब्राऊजरचे डाऊनलोडिंग ० . ०४ टक्के तर ओपेरा ब्राऊजरचे डाऊनलोडिंग ० . ०७ टक्क्यांनी वाढले आहे . सध्या इंटरनेट युजर्समधील निम्म्याहून अधिक युजर हे इंटरनेट एक्स्प्लोरर वापरत आहेत . नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एक्स्प्लोरर हे ५४ . ७६ टक्के इतके वापरले जात आहे . उर्वरित टक्क्यांमध्ये इतर ब्राऊजर्सचा शेअर आहे . यात मॉझिला फायरफॉक्स आघाडीवर आहे . दोन महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या विंडोज ८ या ऑपरेटिंग सिस्टिममुळे एक्स्प्लोररचा वापर वाढल्याचे निरिक्षण अभ्यासात नोंदविण्यात आले आहे . याचा फायदा एक्स्प्लोररच्या नवव्या आवृत्तीलाही झाला आहे .याचा वापर करणा - यांची संख्याही कमालीची वाढली आहे . नोव्हेंबर महिन्यात एक्स्प्लोरर नऊची युजर संख्या २० . ८० टक्के इतकी वाढली आहे . एक्स्प्लोररच्या नव्या व्हर्जन्समुळे जुन्या व्हर्जन्सचा वापर करणा - यांची संख्या घटत चालली आहे . पण नवीन व्हर्जन्समध्ये संख्यात्मक युजर्स अधिक असल्याचे निरिक्षणही यात नोंदविण्यात आले आहे .  क्राम आणि मॉझिल्याच्या ताज्या व्हर्जनपेक्षाही काही प्रमाणात मागसलेल्या असलेल्या एक्स्प्लोरर १०ची युजरसंख्या वाढणे हे सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते . मात्र विंडोज ८सोबत हे एक्स्प्लोरर देण्यात आल्यामुळे याचा वापर करणा - यांची संख्या वाढल्याचे स्पष्ट होत आहे .  एक्स्प्लोररखालोखाल फायफॉक्स ब्राऊजर लोकप्रिय आहे . याचा वापर करणा - यांची संख्या नोव्हेंबर महिन्यात कमी झाली असली तरी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत सर्वाधित युजर्सनी फायरफॉक्सची मदत घेतली आहे .फायरफॉक्स १७चा वापर वाढत असताना जुन्या व्हर्जन्सचा वापर मात्र कमी कमी होऊ लागला आहे . सध्या इंटरनेट युजर्समधील २० . ४४ युजर्स मॉझिलाचा वापर करतात तर १७ . २४ टक्के लोक हे क्रामचा वापर करतआहेत . क्रामच्या २३व्या आवृत्तीला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी त्यांना मॉझिलाचे आणि एक्स्प्लोररचे जाळे भेदणे कठीण आहे . यामुळे पुन्हा एकदा एक्स्प्लोररने आपली नवी आवृत्ती बाजारात आणून आपले अस्तित्त्व सिद्ध केले आहे . 

Page 6 of 7 1 5 6 7
ADVERTISEMENT
error: Content is protected!