CES 2023 मधील घडामोडी सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

रंग बदलणाऱ्या कार्स, 3D लॅपटॉप,  दुमडणारे डिस्प्ले व बरंच काही!

सॅमसंगने नेहमीप्रमाणे आणखी मोठे टीव्ही, NEO QLED चं नवं 8K तंत्रज्ञान, दुमडता आणि सरकवून बाजूला वाढवता येणारे डिस्प्ले, Odyssey OLED नावाचा Curved डिस्प्ले असलेला मॉनिटर आणला आहे.

BeSpoke फॅमिली हब टचस्क्रीन फ्रीज, त्यामध्ये पूर्ण फ्रीजला आपल्या आवडीचं डिझाईन सेट करता येण्याचा पर्याय

सोनीने यावेळी त्यांची होंडा कंपनीसोबत भागीदारी जाहीर करता त्यांचा Afeela ब्रॅंड जाहीर केला असून प्रोटोटाइप इलेक्ट्रिक कारसुद्धा त्यांनी प्रदर्शित केली

 Project Leonardo नावाने एक उपकरण येणार असून याद्वारे अपंगत्व असलेल्या लोकांनाही गेम्स खेळता येतील !

Yoga Book 9i नावाचा ड्युयल डिस्प्ले लॅपटॉप आणला असून दोन 13.3" 2.8K OLED डिस्प्ले एकावर एक जोडलेले आहेत.

BMW i VISION DEE ह्या कारला आपण आवडीनुसार कधीही डिझाईन रंग सर्वकाही बदलू शकता. यामुळे अवघ्या काही सेकंदात कारचं बाहेरील रूप पूर्णपणे बदलता येतं!