आठव्या खिडकीत डोकावताना विंडोज ८ नाविन्य


कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टिमची मक्तेदारी असलेल्या मायक्रोसॉफ्टने ‘ विंडोज ८ ‘ च्या माध्यमातून कम्प्युटर वापराला नवा आयाम दिला आहे. यामुळे कम्प्युटर वापरातील धम्माल आणखी वाढणार आहे. डेस्कटॉपकडून लॅपटॉप आणि आता मोबाइल आणि टॅबलेटपर्यंत येऊन ठेपलेलं युजर मार्केट पुन्हा एकदा डेस्कटॉप एन्जॉय करू शकणार आहेत. ‘ विंडोज ८ ‘ मुळे , सुस्तावलेल्या डेस्कटॉप मार्केटला नवी भरारी मिळू शकेल. 

विंडोज आठबद्दल 

सॉफ्टवेअर जायंट कंपनी मायक्रोसॉफ्टने कम्प्युटर , मोबाइल युजर्सच्या सध्याच्या सवयी लक्षात घेऊन ‘ विंडोज आठ ‘ ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम तयार केली आहे. आपण वापरत असलेल्या मोबाइलपासून ते घरातला किंवा ऑफिसातला लॅपटॉप , डेस्कटॉप एकाच डिव्हाइसवरून वापरता येऊ शकणारी ही अनोखी ऑपरेटिंग सिस्टिम आहे. याबद्दल टेकसॅव्ही मंडळींमध्ये अनेक दिवस उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली असून प्रत्येकाच्या कम्प्युटरवर विंडोज ८ इन्स्टॉल होऊ लागलं आहे. 

अॅप्सचे नाविन्य 

विंडोजने ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रत्येक व्हर्जनमध्ये काहीतरी नवीन दिलं. तसं ‘ विंडोज आठ ‘ मध्ये अॅप्लिकेशनची अनोखी दुनिया विंडोजने आपल्या डेस्कटॉपवर आणून दिली आहे. इतके दिवस मोबाइलपुरते मर्यादित असलेले अॅपवर्ल्ड आता आपला डेस्कटॉप , लॅपटॉप इथेही वापरता येणार आहे. यासाठी विंडोजने एक लाख २५ हजार अॅप्लिकेशन्स डेव्हलप केले आहेत. यामध्ये प्रत्यकाच्या उपयोगाचे म्हणजे अगदी लहान मुलापासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असे अॅप्स आहेत. हे अॅप्स वापरण्यासाठी तुम्हाला सतत इंटरनेटची गरज असणार आहे. अर्थात काही अपवादात्मक अॅप्स असे आहेत की , जे ऑफलाइनही वापरता येऊ शकतात. इंटरनेटशी कनेक्टिव्हिटी असल्यामुळे अॅप्सचे अपडेशन सातत्याने होत असतं. 

डेस्कटॉप व्हर्जन 

‘ विंडोज-८ ‘ मध्ये होम स्क्रीन म्हणजे ज्यामध्ये अॅप्सचा स्क्रीन दिसतो. तर दुसरा पर्याय आहे डेस्कटॉप व्हर्जनचा. यामध्ये आपण विंडोजच्या आधीच्या व्हर्जन्सप्रमाणे काम करू शकतो. ‘ विंडोज-८ ‘ चा डेस्कटॉप व्हर्जन हा अगदी ‘विंडोज-७ ‘ ची हुबेहुब कॉपी आहे. यामुळे ‘ विंडोज-७ ‘ वर चालणारे प्रत्येक सॉफ्टवेअर , सेटिंग्ज या जशाच्यातशा आपल्याला वापरता येऊ शकणार आहेत. यामुळे तसं पाहायला गेलं तर ‘ विंडोज-८ ‘ मध्ये अॅप्सशिवाय नवं असं काहीच देण्यात आलेलं नाही. ‘ विंडोज-८ ‘ मधलं डेस्कटॉप व्हर्जन हे सध्याच्या ‘ विंडोज-७ ‘ सारखंच काम करते. यात मायक्रोसॉफ्टने तीळमात्रही बदल केलेला नाही. यामुळे ऑपरेटिंग सिस्टिमचे अपडेशन करताना कोणत्याही प्रकारची काळजी करू नये. 

असं होईल अपडेशन 

‘ विंडोज-७ ‘ वरून ‘ विंडोज-८ ‘ मध्ये ऑपरेटिंग सिस्टिमचे अपग्रेडेशन करण्यासाठी सध्या एक हजार ९९९ रुपये खर्च करावे लागतील. ही सुविधा जून महिन्यापर्यंत असून त्यानंतर हे दर वाढतील. अपग्रेडेशनसाठी तीन पर्याय उपलब्ध असून यात ‘ विंडोज-७ ‘ चे सर्व सॉफ्टवेअर आणि सेटिंगसह , ‘ विंडोज-७ ‘ च्या सेटिंग्ज आणि तिसरा पर्याय हा पूर्णतः नवीन ऑपरेटिंग सिस्टिम असा आहे. यात जर तुम्ही कोणत्याही पहिला पर्याय स्वीकारला तर तुमचा कम्प्युटर आत्ता जसा चालतो तसाच काम करू शकणार आहे. यासाठी केवळ तुम्हाला 
विंडोज-८चे डेस्कटॉप व्हर्जन वापरावं लागणार आहे.
 

असं असावं हार्डवेअर 

‘ विंडोज-८ ‘ वापरण्यासाठी तुमच्या कम्प्युटरमध्ये खालील गोष्टी असणं गरजेचं आहे. 
किमान एक जीबी प्रोसेसर किंवा त्याहीपेक्षा फास्ट 
विंडोज-८च्या ३२ बीट व्हर्जनसाठी एक जीबीची रॅम आणि ६४ बीट व्हर्जनसाठी दोन जीबी रॅम 
विंडोज-८च्या ३२ बीट व्हर्जनसाठी हार्डडिस्कमध्ये १६ जीबी स्पेस असावी आणि ६४ बीट व्हर्जनसाठी २० जीबी स्पेस असावी 
ग्राफिक कार्ड – मायक्रोसॉफ्ट डारेक्ट एक्स-९ ग्राफिक्स डिवाइस डब्ल्यूडीडीएम ड्रायव्हरसह 
विंडोज-८च्या आणखी काही सुविधा तुम्हाला एन्जॉय करायच्या असतील तर त्यासाठी आणखी सुविधा तुमच्या कम्प्युटर किंवा डिव्हासमध्ये आणखी हार्डवेअर स्पेसिफिकेशन असावं. 
या ऑपरेटिंग सिस्टिममधील टचस्क्रीनचा अनुभव एकदम सुखद आहे. हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला टचस्क्रीन असलेले टॅबलेट किंवा मॉनिटर असणं गरजेचं आहे. 
अॅप स्टोअरचा वापर करण्यासाठी अॅप्स सतत लाइव्ह ठेवण्यासाठी तुम्हाला चांगलं इंटरनेट कनेक्शन असावं याचबरोबर स्क्रीनचं रिझोल्युशन १०२४ बाय ७६८ 

विंडोज-८ मधले की-बोर्डचे काही शॉर्टकट्स 

टचस्क्रीन डिव्हाइसमध्ये माऊस वापरणं तसं अवघडचं असतं. यामुळे आपण काही की-बोर्ड शॉर्टकट्सचा विचार करूयात. यातील बहुतांश शॉर्टकट हे विंडोज की प्रेस करून मगच वापरायचं आहे. 
विंडोज आणि डी- डेस्कटॉपवर जाण्यासाठी हा शॉर्टकट वापरण्यात येतो. याचाच वापर करून तुम्ही विंडोज-८च्या डेस्कटॉप मोडवरही जाता येतं. जेव्हा तुम्ही डेस्कटॉप मोडवर जाता तेव्हा विंडोज-७मधले सर्व पर्याय तिथे वापरता येणार आहे. 
नुस्ती विंडोज की – शेवटचं अॅप्लिकेशनपासून स्टार्ट स्क्रीनमध्ये जाण्यासाठी. 
विंडोज आणि सी – चार्म्स बार दाखवण्यासाठी 
विंडोज आणि आर – डायलॉग बॉक्स पाहण्यासाठी 
विंडोज आणि ई – फाइल मॅनेजर वापरायचं नसेल तर कम्प्युटर बंद करण्यासाठी 
विंडोज आणि आय – पॉपअप सेटिंग्जसाठी इथे तुम्हाला विंडोज स्क्रीन आणि कम्प्युटर शटडाऊन करण्यासाठी. 
विंडोज आणि एक्स – साधा स्टार्ट मेन्यू आणण्यासाठी. याचबरोबर सिस्टिम मॅनेजमेंट अॅप म्हणजे कंट्रोल पॅनेलमध्ये जाण्यासाठी. 

मोबाइल , लॅपटॉप सारं कनेक्ट 

मोबाइल , लॅपटॉप , डेस्कटॉप या सर्व गोष्टी एकमेकांशी कनेक्ट करून केवळ एकाच डिव्हाइसवरून सर्व गोष्टी वापरता येणं ही या ऑपरेटिंग सिस्टिमची खासियत आहे. यामुळे लोकांनी भविष्यात एकाच डिव्हाइसचा वापर करून आपली कामे करावीत , असे ‘ मायक्रोसॉफ्ट इंडिया ‘ चे अध्यक्ष भास्कर प्रामाणिक यांनी स्पष्ट केलं. 

नो पायरसी 

‘ विंडोज-८ ‘ मध्ये पायरसीला कोणत्याही प्रकारचा स्कोप नाही. यातल्या लाइव्ह अपडेट्समध्ये आपल्याला सातत्याने इंटरनेटवर कनेक्ट राहवं लागतं. यामुळे याचा वापर करताना आपलं डिव्हाइस कुठे ना कुठे रेकनाइज्ड होत असतं. तसेच ‘ विंडोज-८ ‘ वापरण्यासाठी आपल्याला युजर म्हणून मायक्रोसॉफ्टकडे नोंदणी करून घ्यावी लागते. यामुळे यामध्ये पायरसीला कोणताही स्कोप नाहीय.

नीरज पंडित 

Exit mobile version