ॲपलच्या काल WWDC या त्यांच्या डेव्हलपर्ससाठी असलेल्या कार्यक्रमात अनेक नव्या गोष्टी जाहीर केल्या असून iOS 18, iPadOS 18, vision OS 2, macOS Sequoia, watchOS 11 अशा ओएस अपडेट्स जाहीर झाल्या आहेत. यासोबत प्रथमच ॲपलने त्यांच्या उपकरणांमध्ये AI टूल्सचा समावेश केला असून याला Apple Intelligence असं नाव दिलं आहे.
ॲप लॉक, पासवर्ड्स ॲप, Genmoji, गेम मोड, Customization चे अनेक नवे पर्याय आणि सरतेशेवटी आयपॅडवर आलेलं कॅलक्युलेटर ॲप होय ॲपल आयपॅडवर आजपर्यंत स्वतःचं कॅलक्युलेटर ॲप उपलब्ध नव्हतं! शिवाय आज जाहीर झालेल्या बऱ्याच गोष्टी अनेक वर्षांपासून अँड्रॉइड आणि विंडोजवर उपलब्ध आहेत!
Apple Intelligence : ॲपलने त्यांच्या AI आधारित सिस्टमला ॲपल इंटेलिजन्स असं नाव दिलं आहे. (Video)
- याद्वारे तुम्हाला महत्वाच्या असतील अशाच नोटिफिकेशन्सना आपोआप प्राधान्य दिलं जाईल.
- ईमेल्स, कीनोट्स, नोट्स आणि वर्ड सारख्या इतर ॲप्समध्येही ही सोय वापरुन लेख तयार करून घेऊ शकता, त्यामधील चुका शोधून घेऊ शकता आणि त्यांचा सारांश तयार करून घेऊ शकता!
- यूजर्स आता स्वतःच्या इमेजेस, स्केच, ॲनिमेशन्ससुद्धा जनरेट करू शकणार आहेत. ही सोय Messages, Apps, Freeform, Keynote आणि Pages मध्ये उपलब्ध असेल.
- ॲपल इंटेलिजन्सला बोलून तुम्ही “Show me all the photos,” “Play the podcast”, “Pull the files that my coworker shared with me last week.” अशा कमांड्स देऊन तुम्हाला हव्या त्या फाइल्स आणि माहिती उघडून पाहू शकता.
- ॲपल इंटेलिजन्स हे ऑन डिव्हाईस प्रकारे असलेल्या मॉडेल्सवर काम करणार असून यामुळे तुमचा डेटा आयफोनवरच असेल आणि सुरक्षित असेल असं ॲपलने सांगितलं आहे.
- सिरीमध्येही आता या AI ची जोड देण्यात आली असून AI द्वारे करता येणाऱ्या सर्व गोष्टी तुम्ही सिरीला बोलून सांगू शकता आणि त्याचं आउटपुट लगेच आपल्याला स्क्रीनवर दिसेल.
- Genmoji नावाच्या नव्या सोयीद्वारे आपल्याला हव्या त्या प्रकारच्या इमोजी तयार करता येतील! या तयार केलेल्या इमोजी मेसेजेसमध्येही वापरता येतील!
- Image Playground द्वारे तुम्ही टाइप केलेल्या प्रॉम्प्ट नुसार हवी ती इमेज तयार करता येते आणि नंतर ती कुठेही शेयर करता येते!
- Image Wand नावाची नवी सोय तुम्ही काढलेल्या स्केचपासून पूर्ण इमेज तयार करून देईल! तुम्ही टाइप केलेल्या मजकूराच्या बाजूला जरी सर्कल केलं तरी त्यावर आधारीत इमेज आपोआप तिथे तयार होऊन दिसेल!
- फोटोज ॲपमध्ये आता फोटोंमधील नको असलेल्या गोष्टी काढून टाकण्याची सोय आली आहे!
- या सोयी On Device प्रकारच्या असून यासोबत OpenAI सोबत भागीदारी करून त्यांनी ChatGPT चीही मदत घेण्याचा पर्याय दिला आहे. जर आपण परवानगी दिली तर आपली request आणि तो डेटा चॅटजीपीटीकडे जाईल आणि त्याचं लगेच उत्तर मिळेल!
- Apple Intelligence फक्त iPhone 15 Pro आणि M1 वर त्याहून नव्या चिप असलेल्या मॅक आणि आयपॅडवरच मिळणार आहे!!!
iOS 18 : iOS 18 preview
- आयफोन आणि आयपॅड युजर्स आता त्यांची होमस्क्रीन Customize करू शकतील आणि त्यांचे ॲप्स होमस्क्रीनवर कुठेही ठेऊ शकतील. ॲप आयकॉन्सचा रंग बदलता येईल! आयफोन्सच्या इतिहासात असे पर्याय प्रथमच देण्यात आले आहेत.
- कंट्रोल सेंटरमध्येही नवे पर्याय असून टॉगलला सुद्धा Customize करता येईल.
- आता ॲप्ससुद्धा स्वतंत्रपणे लॉक करता येणार असून एखादं ॲप लॉक केलं की FaceID शिवाय उघडता येणार नाही अशी ही सोय आहे!
- Game Mode देण्यात येणार असून यामध्ये बॅकग्राऊंड ॲक्टिविटी कमी करून बाहेरच्या गेमिंग accessories ना सपोर्ट मिळेल.
- नवं Passwords ॲप येणार असून यामध्ये तुमचे सर्व पासवर्ड्स साठवता येतील. शिवाय तुम्ही वापरलेले कोणते पासवर्ड हॅक झाले आहेत कोणते पासवर्ड बदलण्याची गरज आहे हे सुद्धा सुचवेल!
iPadOS 18 : iPadOS 18 preview
- अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयपॅडमध्ये प्रथमच कॅलक्युलेटर ॲप मिळणार आहे!
- यासोबत त्यांनी नोट्स ॲपमध्ये Math Notes आणले असून यामध्ये तुम्ही ॲपल पेन्सिलने लिहलेले कॅलक्युलेशन्स, ग्राफ्स, सर्वकाही आपोआप त्याच ठिकाणी उत्तर देईल आणि त्यामध्ये बदल करताच ग्राफमध्येही लगेच बदल झालेला दिसेल!
- Shareplay द्वारे आता इतर आयफोन आणि आयपॅड नियंत्रित करता येईल जेणेकरून ड्रॉइंग स्क्रीन शेयरद्वारे दाखवता येईल!
- तुम्ही लिहलेला मजकूर स्मार्ट स्क्रिप्ट द्वारे ओळखून त्यानुसार कॉपी पेस्ट किंवा तयार केलेला टेक्स्ट दिलेलं उत्तर आपोआप तुमच्याच हस्ताक्षरामध्ये मिळेल!
macOS Sequoia : macOS Sequoia preview
- Apple unveiled MacOS Sequoia, which will feature many of the new features that were added to iOS 18 and iPadOS 18, including the updated Safari, Photos, Messages, and the new Password App.
- iOS18 आणि iPadOS 18 मधील बऱ्याच नव्या सोयी macOS च्या या अपडेटमध्येही मिळणार आहेत.
- आयफोन मिररिंग मधील नव्या सोयीमुळे तुम्हाला आयफोनच्या नोटिफिकेशन मॅकवरच पाहायला मिळतील आणि त्यावर उत्तर सुद्धा तिथूनच देता येईल!
- Window Tiling करणं आता मॅकवरसुद्धा शक्य असून विंडोज ओएसप्रमाणे तुम्ही स्क्रीनच्या ठराविक कोपऱ्यात विंडो नेली की त्याला टाइल्सचा पर्याय सुचवला जाईल.
- AI Summarization Tool मॅकमध्येही मिळणार असून सफारी आणि इतर सॉफ्टवेअरमध्येही त्या AI सोयी वापरता येतील.
वरील अपडेट्ससोबत visionOS 2, tvOS18 आणि watchOS 11 हे अपडेट्स जाहीर करण्यात आले आहेत.