HTC नवा स्‍मार्टफोन डिझायर SV

PHOTOS: HTC ने सादर केला शानदार ड्यूएल सीम स्‍मार्टफोनHTC ने एका नवा स्‍मार्टफोन लॉंच केला आहे. जो एक ड्यूएल स्‍मार्टफोन आहे. HTC डिझायर SV नावाच्‍या या स्‍मार्टफोनमध्‍ये 1 GHz ड्यूएल कोअर प्रोसेसर लावण्‍यात आले आहे. हा फोन अँड्राईड ICS वर काम करतो.
HTC डिझायर SV ड्यूएल कोअर प्रोसेसरबरोबर आहे. या फोनची इंटर्नल स्‍टोरेज 4 जीबी इतकी आहे. यामध्‍ये 8 मेगापिक्‍सलचा कॅमेरा लावण्‍यात आला आहे.या स्‍मार्टफोनला 768 MB रॅम आहे या फोनला अँड्राईड 4.0.4 HTC सेन्‍स 4.1 ऑपरेटिंग सिस्टिम आहे.
ड्यूएल सीम फिचरबरोबर येणा-या या फोनला SV GSM+GSM नेटवर्क सपोर्ट मिळतो. याबरोबर आपल्‍याला 25 जीबी क्‍लाऊड स्‍टोरेज मिळेल.
हा फोन आपल्‍याला रेडिकल यलो आणि स्‍टेल्‍थ ब्‍लॅक रंगात मिळेल. याची किंमत ही 22,590 रूपये इतकी आहे.

Exit mobile version