सॅमसंगने Galaxy Unpacked 2026 इव्हेंटमध्ये आपल्या नवीन फोल्डेबल स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि AI आधारित स्मार्ट चष्म्यांची घोषणा केली आहे. Galaxy Z Fold8 Ultra, Galaxy Z Fold8, Galaxy Z Flip8, Galaxy Watch Ultra2, Galaxy Watch9 आणि Samsung Intelligent Eyewear यामुळे कंपनीने AI आणि Galaxy Ecosystem वर अधिक भर दिला आहे.
२२ जुलै रोजी लंडनमध्ये झालेल्या Galaxy Unpacked 2026 इव्हेंटमध्ये Samsung ने एकाच वेळी अनेक नवीन प्रीमियम डिव्हाइस सादर केले. यामध्ये तीन नवीन फोल्डेबल स्मार्टफोन, दोन स्मार्टवॉच आणि AI आधारित स्मार्ट Eyewear चा समावेश आहे. कंपनीच्या मते, या नव्या उत्पादनांमध्ये Galaxy AI, अधिक मजबूत डिझाइन आणि एकमेकांशी सहज जोडले जाणारे Ecosystem यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
Galaxy Z Fold8 Ultra : Galaxy Z Fold8 Ultra हा Samsung चा आतापर्यंतचा सर्वात प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन आहे. यामध्ये Ultra मालिकेतील कॅमेरा अनुभव, मोठा डिस्प्ले आणि AI आधारित मल्टीटास्किंग फीचर्स देण्यात आले आहेत.
- Ultra दर्जाचा फोल्डेबल डिझाइन
- 200MP मुख्य कॅमेरा 50MP+10MP आणि 10MP+10MP सेल्फी कॅमेरा
- Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर
- Galaxy AI आधारित Productivity फीचर्स
- सॅमसंगचा सर्वात slim फोल्ड फोन
- 5000mAh बॅटरी
Galaxy Z Fold8 : हे Fold मालिकेतील नवीन मॉडेल असून यामध्ये कंटेंट पाहण्यासाठी अधिक सोयीस्कर फॉर्म फॅक्टर देण्यात आला आहे. कंपनीने याचे डिझाइन अधिक कॉम्पॅक्ट केले असून मोठ्या स्क्रीनवर मल्टीटास्किंगचा अनुभव सुधारला आहे. काही महिन्यात येणारया ॲपलच्या फोल्ड फोनचं लिक झालेलं डिझाईन समोर ठेऊन यामध्ये नेहमीचा आकार वापरण्या ऐवजी वेगळा फॉर्म फॅक्टर दिला आहे अशी चर्चा आहे.
- जगातला सर्वात कमी वजनाचा फोल्ड फोन
- 5.5″ 1.5K 120Hz LTPO Display
- 7.6″ 120Hz LTPO 4:3 Display
- Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर
- 4800mAh बॅटरी & 45W Wired Charging
- 50MP Main + 50MP UltraWide + 10MP आणि 10MP सेल्फी
Galaxy Z Flip8 : यामध्ये Samsung ने FlexWindow आणखी उपयुक्त बनवला आहे. फोन न उघडताही अनेक AI फीचर्स वापरता येतात. याशिवाय कॅमेरा आणि सॉफ्टवेअरमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
- मोठा FlexWindow
- Galaxy AI सपोर्ट
- सुधारित कॅमेरा
- अधिक पातळ आणि हलका Flip डिझाइन
- 4300mAh बॅटरी
Galaxy Watch Ultra2 आणि Galaxy Watch9 : Samsung ने दोन नवीन स्मार्टवॉचही सादर केली आहेत. Galaxy Watch Ultra2 हे साहसी प्रवास, फिटनेस आणि आउटडोअर वापरासाठी तयार करण्यात आले आहे. यामध्ये अधिक ब्राइट डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि नवीन हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स देण्यात आले आहेत. Galaxy Watch9 मध्ये रोजच्या वापरासाठी आवश्यक Health Monitoring, Fitness Tracking आणि Galaxy AI आधारित स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत. दोन्ही घड्याळे Samsung Health Ecosystem सोबत अधिक चांगल्या प्रकारे काम करतात.
Samsung Intelligent Eyewear ची झलक : Samsung ने AI आधारित Intelligent Eyewear देखील सादर केले. हे डिव्हाइस Google आणि इतर भागीदार कंपन्यांसोबत विकसित करण्यात आले आहे. या स्मार्ट चष्म्यामध्ये पुढील फीचर्स देण्यात येणार आहेत. सॅमसंगने सध्या या उत्पादनाची फक्त झलक दाखवली असून त्याची अधिक माहिती आणि उपलब्धता पुढील काळात जाहीर केली जाईल.
- Real-time Translation
- AI Assistant
- Hands-free माहिती
- Privacy लक्षात घेऊन तयार केलेली रेकॉर्डिंग प्रणाली
भारतातील उपलब्धता : Samsung ने भारतात Galaxy Z Fold8 Ultra, Galaxy Z Fold8 आणि Galaxy Z Flip8 साठी प्री-बुकिंग सुरू केली आहे. कंपनीने बँक ऑफर्स, Upgrade Bonus आणि No Cost EMI सारख्या ऑफर्सचीही घोषणा केली आहे. भारतीय किंमती खालील प्रमाणे
Samsung Z Fold 8
12GB RAM + 256GB : ₹ 1,79,999
12GB RAM + 512GB : ₹ 1,99,999
16GB RAM + 1TB : ₹ 2,39,999
Samsung Z Fold 8 Ultra
12GB RAM + 256GB : ₹ 1,99,999
12GB RAM + 512GB : ₹ 2,19,999
16GB RAM + 1TB : ₹ 2,59,999
Samsung Z Flip 8
12GB RAM + 256GB : ₹ 1,24,999
12GB RAM + 512GB : ₹ 1,44,999
Galaxy Watch 9
Bluetooth 40mm – ₹ 37,999
Bluetooth 44mm – ₹ 40,999
LTE 40mm – ₹ 41,999
LTE 44mm- ₹ 44,999
Galaxy Watch Ultra2 : ₹ 64,999











