भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीयांनी खूप मोठी झेप घेतली आहे. विंडोज , लिनक्स , अँड्रॉइडसह विविध ऑपरेटिंगसिस्टीमच्या विकासात हातभार लावला आहे . पण संपूर्ण भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम बनविण्यात भारताला अद्याप यश आलेले नाही . पण येत्या तीन वर्षांत ही गोष्ट साध्य होऊ शकते . संरक्षण संशोधन व विकास संस्थाअर्थात डीआरडीओ इतर काही संस्थांच्या मदतीने यावर काम करते आहे . 

बाहेरील देशातून विंडोज , लिनक्स यासारख्या ऑपरेटिंग सिस्टीम आयात केल्याने व्हायरसचा धोका असतो .त्यामुळे आपली स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम असणे अनिवार्य असल्याचे डीआरडीओचे प्रमुख व्ही . के . सारस्वतम्हणाले . नवीन ऑपरेटिंग सिस्टीम विकसित करण्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू असून त्याला मोठ्याप्रमाणात सॉफ्टवेअर इंजिनीअरची गरज लागणार आहे . सध्या देशभरातील १५० इंजिनीअर्स यावर काम करतअसून संपूर्ण भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम पूर्ण व्हायला आणखी तीन वर्षं लागतील . विशेष म्हणजे यासाठी कुठल्याही प्रकारची परदेशी मदत घेतली जाणार नाही . त्यामुळे देशातील उद्योग , संशोधक , वैज्ञानिकांनीडीआरडीओ आणि इतर वैज्ञानिक विभागांच्या साथीने या कामाला हातभार लावावा . त्यामुळे पूर्णपणे स्वायत्तहोणे भारताला शक्य होईल , असे आवाहन त्यांनी केले . 

यापूर्वीही भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्याचे काही प्रयत्न झाले होते . तामिळनाडूतील लोयोला इंजिनीअरिंग कॉलेजचा विद्यार्थी दीपक जॉन यानेही गेल्या वर्षी मायक्रोस ( मोबाइल इनक्युर्ड रिव्होल्युशनाइज्ड ऑपरेटिंग सिस्टीम ) ही ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली होती . दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या दीपकची सिस्टीम क्रॅश झाल्याने त्याला ही प्रेरणा मिळाली होती . १०० एमबी आकाराची ही ओएस त्याने क्लाऊडवर तयार केली होती. त्यामुळे पेनड्राइव्हमधूनही ती वापरता येत होती . त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या इन्स्टॉलेशनची गरज नव्हती पण सिस्टीममध्ये साठविलेल्या विविध फाइल्स यामध्ये अॅक्सेस करता येत होत्या व त्यावर कामंही करता येत होती . त्याने यामध्ये ओपन ऑफिसही दिले होते . यावर इंटरनेट आणि विंडोजवरील विविध अॅप्लिकेशन वापरता येतात . कम्प्युटर बंद केल्यावर त्यातील रॅममध्ये असणारी या संदर्भातील सर्व माहिती डिलीट होत असल्याने युझर्सला त्यांची गोपनीयता जपता येत होती .
Exit mobile version