फेसबुक बदलणार आपले लूक

fb new lookतरुणांबरोबरच जाहिरातदारांमध्येही लोकप्रिय असलेली सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आता नव्या रुपात आपल्याला दिसणार आहे. येत्या सात मार्च रोजी एफबी पेजचा न्यूज फीड नव्या रुपात लाँच करत असल्याचे फेकबुकच्यावतीने एका इ-मेलमार्फत जाहीर करण्यात आले आहे.

१०० कोटींहून अधिक युजर्स असणा-या फेसबुकचा नवा लूक कॅलिफोर्नियामधील मेन्लो पार्कमध्ये एका मोठ्या पत्रकार परिषदेदरम्यान लाँच केला जाईल. यंदाच्या वर्षातले एफबीचे हे दुसरे मोठे प्रॉडक्ट लाँचिंग आहे. याआधी जानेवारीत फेसबुकने सोशल सर्च फीचर बाजारात आणले होते.

फेसबुक पेजवरील सध्याच्या न्यूजफीडमध्ये युजर्सच्या मित्रांनी नुकतेच टाकलेले फोटोज, व्हिडीओ आणि प्रतिक्रियाचे अपडेट मिळत असतात. युजर्स प्रोफाईल, सर्च आणि न्यूजफीड हे फेसबुकचे तीन महत्वाचे पिलर्स असून युजर्सना आकर्षित करण्यासाठी नवा लूक लाँच करत असल्याची माहिती फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी दिली.

या आधी फेसबुकने २०११ साली सप्टेंबर महिन्यात न्यूजफीडमध्ये बदल केले होते. त्या बदलानंतर फेसबुकवरील सर्व जाहिराती थेट न्यूज फीडमध्ये दिसू लागल्या होत्या. कंपनीने २०११ नंतर मोबाईलवरुन फेसबुक वापरणा-यांची संख्या लक्षात घेता आपल्या मोबाईल व्हर्जनकडे सर्वाधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मागील एका वर्षात मोबाईलवरुन फेसबुक लॉगइन करणा-यांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाली आहे. मात्र इतके प्रयत्न करुनही आजही फेसबुकच्या कम्प्यूटर व्हर्जनपेक्षा मोबाईल व्हर्जनमध्ये अनेक त्रुटी असल्याने त्याकमी करुन त्यांचे एकत्रिकरण करण्याकडे फेसबूक जास्त लक्ष देईल असे मत गार्टनर या संशोधन संस्थेच्या ब्रायन ब्ले यांनी व्यक्त केले आहे

Exit mobile version