AMAZING WEBSITE: फ्लाईटची माहिती घेण्‍यासाठी अत्‍यंत उपयुक्‍त

www.flightradar24.com हे संकेतस्थळ पाहून तुम्ही नक्कीच आश्यर्यचकित व्हाल. तंत्रज्ञान काय काय करू शकते, हे या संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेता येईल. फ्लाइट रडार एक ग्लोबल मॅप असून तो हवेत उडणार्‍या सर्व विमानांना ट्रॅक करतो. या मॅपच्या माध्यमातून एखादे व्यावसायिक विमान सध्या कोणत्या लोकेशनवर उडत आहे,

 याचा शोध तुम्हाला कधीही घेता येऊ शकेल. तसेच तुमची फ्लाइट वेळेवर उडणार की लेट आहे, हेदेखील तुम्हाला जाणून घेता येईल. यासाठी संकेतस्थळ एडीएस-बी (ऑटोमॅटिक डिपेंडंट सर्व्हिलंस-ब्रॉकास्टर) चा वापर करते. हे तंत्रज्ञान जवळपास 60 टक्के प्रवासी विमानांमध्ये लावण्यात आलेले असते. या संकेतस्थळाचा डाटा अमेरिका आणि यूरोपमध्ये जास्त अचूक असतो. तथापि, भारतातही याचे चांगले परिणाम मिळतात. संकेतस्थळाच्या माध्यमातून तुम्हाला तातडीने एखादी फ्लाइट आणि विमानतळ सर्च करता येईल. याशिवाय तुम्ही प्लेन मेन्यूमध्ये जाऊन कॉलसाइन, फ्लाइट नंबरच्या माध्यमातूनही सर्च करू शकता.

Exit mobile version