6000 हजारातील या टॅबमध्ये सिम कार्डही वापरता येईल

6000 हजारातील या टॅबमध्ये सिम कार्डही वापरता येईलजगातील सर्वात स्वस्त टॅब्लेट ‘आकाश’ची निर्मीती करणा-या डाटाविंडने आता सिम कार्डचा वापर करता येईल असा टॅब्लेट उपलब्ध करून दिला आहे.  डाटाविंडने सादर केलेल्या या टॅब्लेटची किंमत रु. 5,999/- आहे. सध्या केवळ एका वेब पोर्टलद्वारेच त्याची खरेदी करता येणार आहे.
डाटाविंड यूबीस्लेट 7C+ Edge असे या टॅब्लेटचे नाव असून त्याचा डिस्प्ले आकार सात इंचा एवढा आहे.
 त्याचे  रिझोल्युशन 800×480 आहे. या टॅबला व्हिडिओ चॅट करण्यासाठी पुढील बाजूस व्हीजीए कॅमेरा देण्यात आला आहे.यूबील्सेट 7C+ Edge अ‍ॅन्डओईड 4.0 वर आधारित आहे. यात 1 गीगाहर्टझ-ए 8 क्षमतेचा कोर्टेक्स प्रोसेसर आहे. 512एमबी रॅम आणि (आरओएम) 4 जीबी इंटर्नल मेमरी 32 जीबीपर्यंत विस्तारक्षम आहे. या टॅबमध्ये मॉडर्न हायटेक जनरेशनच्या सर्व गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे.3200 एमएएच क्षमतेची याची बॅटीरी असून वाय-फाय वर चार तासांचा बॅकअप टाईम मिळतो.
यात वाय-फाय आणि 2 जी कनेक्टिव्हीटीची सुविधा आहे. त्याचबरोबर डोंगलच्या सहाय्याने 3 जी कनेक्शनही घेता येते.डाटाविंडची निर्मीती असलेला हा टॅब सध्या snapdeal.com वरच उपलब्ध आहे. सहा आणि तीन महिने ईएमआयची ही सुविधा देण्यात आली आहे.

Exit mobile version