स्मार्ट चॉइस : थ्रीएम टच पेन

स्मार्टफोनने तर आपली दुनिया केव्हाच काबीज केली आहे. आता येणाऱ्या काळात टॅब्लेटही अशाच प्रकारे सर्वत्र दिसू लागतील, असे म्हटले जाते. या दोन्ही उपकरणांच्या वापरामध्ये असे लक्षात आले आहे की, अनेकांना टचस्क्रीनवर बोटांनी काम करणे जड जाते. त्याऐवजी एखाद्या पेनने काम करणे हे सोपे वाटते. पण त्या टचस्क्रीनवर आपले नेहमीचे पेन चालत नाही. त्यासाठी वेगळी संवेदना असलेले पेन वापरावे लागते. हल्ली अनेकजण टॅब्लेट किंवा स्मार्टफोनवर अशाच प्रकारचे पेन वापरताना नजरेस पडतात. 

अशा प्रकारचे एक नवे थ्री एम टच पेन बाजारात आले आहे. कपॅसिटीव्ह टचला संवेदनक्षम असलेले असे हे पेन असून त्यामुळेच टचस्क्रीनवर वापरण्यासाठी ते अतिशय उपयुक्त आहे. आयपॅड, आयफोन आणि आयपॉड या सर्वच प्रकारच्या उपकरणांसाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. केवळ एवढेच नव्हे तर अलीकडे लॅपटॉपचा स्क्रीनही टचस्क्रीन प्रकारातच मोडणारा असतो त्यामुळे अशा प्रकारे टचस्क्रीन असलेल्या सर्वच ठिकाणी त्याचा वापर केला जाऊ शकतो. या पेनाचा समोरचा टोकाचा भाग हा अतिशय मृदू असून त्यामुळे टचस्क्रीनवर त्याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. अनेकांना लिहिताना अशा प्रकारचे डिजिटल पेन खूपच उपकारक वाटते. ते पकडण्यासाठी त्याला चांगली ग्रिपही देण्यात आली आहे. याची किंमतही तशी माफकच आहे.भारतीय बाजारपेठेतील किंमत  रु. ९९९/-

– वैदेही

Exit mobile version