MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home News

टचस्क्रीनची चिंता नको!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
December 10, 2012
in News
नव्वदच्या दशकापर्यंत लँडलाइन फोन हीच चैन होती. पुढे कॉर्डलेस आल्यानंतर फोनच्या वापरामध्ये आणखी सुलभता आली. त्यानंतर मोबाइलचा विचार पुढे आला. पण लोकांना फोन सोबत घेऊन फिरणे आवडणार नाही , असे सांगत मोबाइल उत्पादनासाठी सादर केलेला कर्जाचा प्रस्ताव सुरुवातीला एका बँकेने फेटाळला होता! पुढे मोबाइलला मिळालेली लोकप्रियता आणि उर्वरित इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. 


पुढे मोबाइलचा आकार त्रासदायक वाटू लागल्याने स्लिम मोबाइल आले. बटणे दाबणे कष्टप्रद वाटू लागल्याने टचस्क्रीनचा जमाना आला. सध्या टचस्क्रीन चलतीत आहे. त्यामुळे मोबाइलचा फारसा उपयोग असो वा नसो ,जपून वापर करणे शक्य असो वा नसो , टचस्क्रीन घेण्याकडे अनेकांचा कल असतो. अर्थात आता या टचस्क्रीनच्या काही त्रुटीही जाणवू लागल्या आहेत. हे मोबाइल अतिशय काळजीपूर्वक वापरावे लागतात , त्यासाठी धसमुसळेपणा चालत नाही. सर्वांनाच हे जमत नाही आणि मग स्क्रीनवर थोडाही ओरखडा उठला अथवा मोबाइल जमिनीवर पडला तर खिशाला चाट पडते. 


यावर मात करण्याचे आव्हान सॅमसंगने आव्हान पेलले आहे. गॅलेक्सीच्या नव्या सीरीजमध्ये दुमडता येण्याजोगी आणि न तुटणारी अर्थात फ्लेक्सिबल आणि अनब्रेकेबल स्क्रीन आणण्याचा विचार कंपनीने केला आहे. या प्रोजेक्टला कंपनीच्या मोबाइल विभागाचे प्रमुख जेके चिन यांच्या नावावरून ‘ प्रोजेक्ट जे ‘ हे कोडनेम देण्यात आले आहे. येत्या एप्रिलमध्ये दाखल होणाऱ्या गॅलक्सी एस ४ मध्ये ही अनब्रेकेबल स्क्रीन असण्याची शक्यता आहे. अॅपलच्या आयफोनला टक्कर देण्यासाठी गॅलक्सीची ही अनब्रेकेबल स्क्रीन मोठा सेलिंग पॉइंट ठरू शकतो. 
एस ४मध्ये तुलनेने मोठा आणि चांगला डिस्प्ले असून , पॉवरफुल क्वॉडकोअर प्रोसेसिंग पॉवरही असणार आहे. विशेष म्हणजे , यात १३ मेगापिक्सल कॅमेराही असेल , त्यामुळे फोटोची क्वालिटी प्रत्येक इंचाला ४४१ पिक्सलने वाढेल. म्हणजेच गॅलक्सी एस ३ (३३६) आणि आयफोनपेक्षा (३२६) फोटोची क्वालिटी कितीतरी चांगली असेल. सॅमसंग गॅलक्सी एस ४ आणि ५मध्ये अनब्रेकेबल आणि फ्लेक्सिबल स्क्रीन असेल , असे तज्ज्ञ सांगत असले तरी खुद्द सॅमसंगने मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र अशा प्रकारच्या स्क्रीनच्या शोधात सॅमसंग आघाडीवर आहे. त्यासाठी ऑरगॅनिक एलइडीच्या पॅनलमधील काचेऐवजी प्लास्टिक वापरल्यास स्क्रीन अनब्रेकेबल होऊ शकते. त्यामुळे आगामी वर्षांत मोबाइल गॅजेटमध्ये फ्लेक्सिबल तसेच अनब्रेकेबल स्क्रीन्सची चलती होऊ शकते. 

ADVERTISEMENT
Tags: DevicesSamsungTouchscreen
ShareTweetSend
Previous Post

जीमेलचे ‘स्पेस मॅनेजमेंट’

Next Post

यूट्यूबचा नवा हिरो

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

Samsung Galaxy S23

सॅमसंगचे Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra सादर!

February 1, 2023
CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

January 8, 2023
सॅमसंगचा Galaxy Tab S8 भारतात सादर : Tab S8, S8+ आणि S8 Ultra

सॅमसंगचा Galaxy Tab S8 भारतात सादर : Tab S8, S8+ आणि S8 Ultra

February 22, 2022
Galaxy Tab S8

सॅमसंग Galaxy Tab S8, S8+, S8 Ultra टॅब्लेट्स जाहीर

February 9, 2022
Next Post

यूट्यूबचा नवा हिरो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023
सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

March 17, 2023
टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

March 10, 2023
एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
ADVERTISEMENT
MarathiTech – मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

March 20, 2023
जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

March 18, 2023

नवा व्हिडिओ : ॲपल मॅकवर मराठीत टायपिंग!

जियो व एयरटेलतर्फे ग्राहकांना अमर्यादित मोफत 5G डेटा!

सॅमसंगचे Galaxy A34 5G आणि A54 5G भारतात सादर!

टी सिरीजच्या हनुमान चालीसा व्हिडिओला तब्बल ३०० कोटी व्ह्यूज!

नोकियाचा कंपनीचा नवा लोगो

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2022 A Product by BagalTech

error: Content is protected!