जगातील पहिला राऊंड कर्व्ह डिस्प्ले स्मार्टफोन लॉंच, सॅमसंगची इतरांवर मात

जगातील पहिला राऊंड कर्व्ह डिस्प्ले स्मार्टफोन लॉंच, सॅमसंगची इतरांवर मातसॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडने राऊंड कर्व्ह डिस्प्ले असलेला जगातिल पहिला स्मार्टफोन आज (बुधवार) लॉंच केला. गॅलेक्सी नोटच्या स्वरूपात हा स्मार्टफोन सादर करण्यात आला असून न फुटणाऱ्या स्क्रिनसह वेगवेगळ्या प्रकारातील स्क्रिनची चॉईस आता सॅमसंग ग्राहकांना मिळणार आहे.

हायएंड स्मार्टफोन बाजारपेठेत सध्या मंदिचे वातावरण आहे. या बाजारपेठेतील आपली पकड मजबूत करण्याचा उद्देश समोर ठेऊन सॅमसंगने जगातील पहिला राऊंड कर्व्ह डिस्प्ले असलेला स्मार्टफोन सादर केला आहे. यासह सॅमसंगने अॅपल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांवर नवनवीन प्रॉडक्ट सादर करण्यात मात केली आहे.

नवीन गॅलेक्सी राऊंडसाठी कर्व्ह टच स्क्रिन मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता यापूर्वी सॅमसंगकडे नव्हती असे सांगून हाना दाईतू सेक्युरिटी अॅनॅलिस्ट नाम दाई-जोंग म्हणाले, की न फुटणाऱ्या स्क्रिनसह वेगवेगळ्या प्रकारातील स्क्रिन स्मार्टफोनसाठी उपलब्ध होण्याच्या दिशेने उचललेले हे पहिले पाऊल आहे. परंतु, सध्याच्या बाजारपेठेचा विचार केल्यास हे प्रॉडक्ट केवळ सिम्बॉलिक ठरण्याची शक्यता जास्त आहे. कर्व्ह डिस्प्लेसह इतर युनिक फिचर्स येत नाहीत. त्यामुळे स्मार्टफोन जगात उचलण्यात आलेले हे नवे पाऊल कितपत यशस्वी ठरेल, हे आताच सांगता येणार नाही.

गॅलेक्सी राऊंडला 5.7 इंचाचा (14.4 सेंटिमिटर) डिस्प्ले आहे. याला हलकासा हॉरिझॉंटल कर्व्ह देण्यात आला आहे. परंतु, या स्मार्टफोनचे वजन गॅलेक्सी नोट 3 पेक्षा जरा कमी आहे. सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या फ्लॅट स्क्रिन डिस्प्ले फोनच्या तुलनेत याला हातात पकडणे अधिक सोपे आहे.

* कसा आहे नवा फोन ? 

>> ५.७ इंचाचा स्क्रीन , गॅलेक्सी नोट ३ पेक्षा वजन कमी 
>> राउंड स्क्रीनमुळे हातात धरणे सुलभ , बॅटरी नेहमीसारखी 
>> टिल्ट फंक्शनमुळे मिस्ड कॉल्स , बॅटरी लाइफची माहिती होम स्क्रीन ऑफ असला तरीही पाहता येणार 
>> स्क्रीनच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला नुसता स्पर्श करून मीडिया फाइल्सचे स्क्रोलिंगही करता येणार होम स्क्रिन ऑफ असतानाही मिस कॉल आणि बॅटरी लाईफ तपासण्याची सुविधा या स्मार्टफोनमध्ये आहे. स्क्रिनच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला दाब देऊन मीडिया फाईल्स स्क्रोल करणे यात शक्य आहे. सध्या हा स्मार्टफोन केवळ दक्षिण कोरियात उपलब्ध होणार असून इतर देशांमध्ये तो कधी सादर केला जाईल, यासंदर्भात काहीही माहिती देण्यात आलेली नाही

Exit mobile version