देशातील इंटरनेट यूजर्स @ २४.३ कोटी ???? (जून २०१४ अखेर)

स्मार्टफोनची वाढती विक्री आणि त्या माध्यमांतून होणारा इंटरनेटचा वापर यांमुळे आगामी आठ महिन्यांमध्ये देशातील इंटरनेट यूजरच्या संख्येत १८.५३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. 

इंटरनेटचा वापर असाच वाढत राहिल्यास जून २०१४ अखेर इंटरनेट यूजरची संख्या २४.३ कोटींवर पोहोचेल, असा अंदाज ‘इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया’ने (आयएएमएआय) व्यक्त केला आहे. हे अंदाज खरे ठरल्यास सर्वाधिक इंटरनेट यूजरच्या यादीत अमेरिकेला मागे टाकून भारत दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची दाट शक्यता आहे, असे ‘आयएएमएआय’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ऑक्टोबर २०१३अखेर देशातील इंटरनेट यूजर्सची संख्या २०.०५ कोटींच्या घरात असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. डिसेंबर २०१३पर्यंत यूजरसंख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांची वाढ होऊन ती २१.३ कोटींवर जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

ठळक बाबी 

डिसेंबर २०१३पर्यंत मोबाइल इंटरनेट यूजरची संख्या १३ कोटींवर जाण्याचा अंदाज. 

अॅक्टिव्ह यूजर्सपैकी ९० टक्के यूजर्स इंटरनेटचा वापर संवाद साधण्यासाठी करतात. त्यातही संवाद साधण्यासाठी ७८ टक्के यूजर्सद्वारा ई-मेल्सचा वापर. 

भारतातील इंटरनेट यूजरची संख्या १ कोटीवरून १० कोटींवर जाण्यासाठी दशकभराचा कालावधी लागला. मात्र, ही संख्या केवळ तीन वर्षांतच १० कोटींवरून २० कोटींवर पोहोचली. आजच्या घडीला देशातील मोबाइल इंटरनेट क्षेत्रात अनेक कंपन्यांनी सेवेचा विस्तार केल्याने आगामी काही वर्षांत भारतच यूजरच्या बाबतीत अव्वलस्थानी जाईल. 

– राजन आनंदन, अध्यक्ष, आयएएमएआय 

*इंटरनेट यूजर्सची संख्या 

चीन- ३० कोटी 

अमेरिका- २०.७ कोटी 

भारत- २०.५ कोटी 

(स्रोत : आयएएमएआय) 

Exit mobile version