बंगलोरमध्ये नागरिकांसाठी मोफत वायफाय सुविधा

बंगलोर शहर देशातील माहिती तंत्रज्ञानाची गंगोत्री म्हणून ओळखली जाते. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या कंपन्यांची डेव्हलपमेंट सेंटर बंगलोरमध्येच आहेत. आता या लौकिकात आणखी भर पडणार आहे ती म्हणजे मोफत वाय फाय सुविधेची….
कर्नाटक सरकारनं बंगलोरमधील सर्व नागरिकांना मोफत वाय फाय सूविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशात अशा प्रकारची सूविधा उपलब्ध करुन देण्याचा हा पहिलाच उपक्रम आहे. आता बंगलोरमधील नागरिकांना विना खर्च इंटरनेटवर मुक्त संचार करता येणार आहे. नम्म वाय फाय या नावानं ओळखली जाणाऱ्या वाय फाय सेवेद्वारे नागरिकांना स्मार्टफोन, टॅबलेट, नेटबूक, लॅपटॉप आणि इतर मोबाईल उपकरणांनी इंटरनेट सूविधा लाभ घेता येणार आहे.
बंगलोरमधील एमजी रोड किंवा ब्रिगेड रोड हे मध्यवर्ती ठिकाण असो, शांतीनगर किंवा यंशवतपूर सारखी बस स्थानकं असो किंवा इंदिरानगर सारखं पॉश उपनगर… सर्वत्र नम्म वाय फाय सेवेच्या माध्यमातून नागरिकांना जगाशी जोडलेलं राहता येणार आहे. राज्याच्या माहिती तंत्रज्ञान खात्यानं तसचं इनफॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.
पुढच्या वर्षी शहरातील आणखी दहा महत्वाच्या ठिकाणीही ही सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नम्म वाय फायचा वेग 512 Kbps आणि दिवसाला या सेवेचा लाभ तीन तास किंवा 50 MB पर्यंत घेता येणार आहे. शहरातील महत्वाच्या उपनगरांध्ये कामानिमित्त येणाऱ्या हजारो नागरिकांना या सेवेचा लात्र मिळणार आहे.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे. इच्छुकानं नेटवर्कवर नोंदणी केल्यानंतर त्यांच्या मोबाईल क्रमांकावर वाय फाय सेवेचा पासवर्ड पाठवला जाईल. बंगलोर स्मार्ट आणि कनेक्टेड शहर होण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल असल्याचं इंटरनेट आणि वाय फाय सेवा पुरविणारी कंपनी D Vois Broadband Ltd व्यवस्थापकीय संचालक रमेश सत्य यांनी सांगितलं…
सध्या भारतात सर्वत्रच तरुणाई टेक्नोसेव्ही झाली आहे. मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर्स आदी बाबी तर सर्वांसाठीच आवश्यक झाल्या आहेत. त्यामुळं बंगलोरचा हा आदर्श इतर शहरांनीही घ्यायला काहीच हरकत नाही.

Extra tags : Bangalore becomes first city in India to offer free WiFi

Exit mobile version