आता मृत पावलेल्यांशी व्हिडिओ चॅटिंग शक्य !!!!

आपल्या प्रियजनांशी मृत्यूनंतरही संवाद साधता येईल अशा वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे. Eterni.Me असं या वेबसाईडचं नाव आहे. मृत व्यक्तींचं आभासी अस्तित्व म्हणजेच व्हर्च्युअल अवतार ही नवी वेबसाईट तयार करते. मॅसाच्यूसेटस इन्स्टिटयुट ऑफ टेक्नोलॉजीच्या आंत्रप्रेन्यूरशीप डेव्हलपमेंट प्रोग्रामचा एक भाग म्हणून इंजिनिअर्स, डिझायनर्सनी Eterni.Me या वेबसाईटची निर्मिती केली आहे.  
मृत्यूनंतर व्यक्तीचं आभासी अस्तित्व अर्थात व्हर्च्यूअल अवताराची डिजिटली पुर्नरचना करता येते असा या टीमचा दावा आहे. यासाठी त्या व्यक्तीच्या चॅट लॉग, सोशन नेटवर्कची माहिती, फोटो आणि इमेल उपलब्ध करुन दिल्यास त्या माहितीच्या आधारे त्या व्यक्तीची स्मृती, स्वभाव याची जडणघडण करता येते.
Eterni.Me ही वेबसाईट तुम्ही तुमच्या आयुष्यात निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे संकलन करते आणि आर्टिफिशयल इंटिलिजिन्स अल्गोरिथमचा वापर करुन या प्रचंड माहितीवर प्रक्रिया करते. या प्रक्रियेच्या माध्यमातून तुमच्या वर्च्युअल अवताराची निर्मिती करण्यात येते. ज्यात तुमचं व्यक्तीमत्व घडवण्यात येते आणि तुमच्या मृत्यूनंतर तुमचे कुटुंब आणि मित्रपरिवार यांना तुमच्याशी संवाद साधता येतो.
ही वेबसाईट सुरु झाल्यापासून अवघ्या 24 तासात 36,000 पेज व्ह्यू आणि 1300 जणांनी इमेल रजिस्ट्रेशन केलं आहे. आता मरणानंतरही तुमचं अस्तित्व वर्च्युअल स्वरुपात अमर राहणार असल्यानं सर्वांच्या मनात या वेगळ्या प्रकाराची कुतुहल निर्माण झालं आहे. 
Exit mobile version