सॅमसंग GALAXY S5 लॉन्च : फिंगरप्रिंट स्कॅनर हार्ट रेट स्कॅनर

'सॅमसंग'ने लॉन्च केला 'GALAXY S-5', एप्रिलमध्ये येईल बाजारात!सॅमसंग‘ने आपला बहुप्रतीक्षित स्मार्टफोन ‘GALAXY S-5’ लॉन्च केला आहे. सोमवारी रात्री स्पेनची राजधानी बार्सिलोना येथे आयोजित ‘मोबाइल वर्ल्ड परिषदे‘त सॅमसंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेके शिन यांनी हा फोन सादर केला.

‘GALAXY S-5’ येत्या 11 एप्रिलपासून 150 देशांतील स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ‘GALAXY S-5’ची किंमत किती असेल याबाबत मात्र खुलासा होऊ शकलेला नाही. याशिवाय सॅमसंगने एक ‘फिटनेस बॉंड गिअर फिट 2’ देखील लॉन्च केला आहे. गॅलक्सी S5 मध्ये अॅपलचा  आयफोन 5S प्रमाणे फिंगरप्रिंट स्कॅनर फीचर्स आहे. व्हाइट, ब्लॅक, ब्लू आणि कॉपर गोल्ड या चार कलरमध्ये गॅलक्सी S5 उपलब्ध होईल.
 
गॅलेक्सी S5 शानदार कॅमेरा, फिंगरप्रिंट स्कॅनर, हेल्थ फीचर आणि किड्स मोडने अद्ययावत असेल. विशेष म्हणजे डस्ट आणि वॉटर प्रुफ असेल. बॅक कॅमराखाली एक हॉर्ट सेंसर बसवण्यात आले आहे. ते यूजरच्या हार्ट रेटवर लक्ष देण्याचे काम करेल. होम बटनवर फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. या बटनाच्या साह्याने फोन लॉक आणि अनलॉक करता येऊ शकतो.

किड्स मोड फीचर्समुळे हा फोन मुलांनी हाताळला तरी काही हरकत नाही. किड्स मोड ऑन केल्यानंतर किड्‍स मोडवर असलेल्याच अॅपचा ते वापर करू शकतात.
 
‘सॅमसंग गॅलक्सी S5’ मध्ये 1080×1920 पिक्सल्स रेझोल्यूशन असलेला 5.1 इंचाचा सुपर एमोलेड डिस्पेल बसवलेला आहे. 2.5 गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर आणि 2 जीबी रॅमवर आपले कार्य करतो. अँड्रॉइड 4.4.2 किटकॅट लेटेस्ट व्हर्जनने हा फोन अद्ययावत आहे. गॅलेक्सी S5 मध्ये 16 मेगा पिक्सलचा बॅक कॅमेरा आणि 2.1 मेगा पिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. त्यामुळे या फोनची दुसर्‍या फोनसोबत तुलना करता येऊ शकत नाही. सॅमसंगने गॅलक्सी S5 ला  16 जीबी आणि 32 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या व्हेरिएंटमध्ये उतारला आहे. एसडी कार्ड ने स्टोरेज क्षमता 64 जीबीपर्यंत वाढवता येईल. गॅलक्सी S5 चे वजन अवघे 145 गॅम आहे. बॅटरी 2800 MAH असल्याने 390 तासांचा स्टॅंडबाय टाइम आणि 21 तासांचा टॉकटाइम असल्याचा कंपनीने दावा केला आहे.

सॅमसंगचे सीईओ जेके शिन म्हणाले, कंपनीने आतापर्यंत 200 मिलियन गॅलक्सी फोनची विक्री केली आहे. गॅलक्सी S4 ला गेल्या वर्षी उन्हाळ्यात लॉन्च केला होता. मात्र, S4 ला अॅपलचा आयफोन 5 आणि 5S, LG G2, HTC वन आणि सोनी एक्सपीरिया Z1 कडून तगडे आव्हान मिळाले होते. ‘गॅलक्सी S5’ला लॉन्च केल्यानंतर सॅमसंगने S4 चे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Exit mobile version