‘गुगल ट्रेकर’ कसे काम करते..

पाठीवर लावावयाच्या बॅगपॅकमध्ये एक कॅमेरा ठेवलेला असतो. मात्र, तो सुरू करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी लागते. या कॅमेऱ्याचे वजन तब्बल अठरा किलो असते. या कॅमेऱ्यात पंधरा लेन्स लावण्यात आलेले असतात. कॅमेरा सुरु होताच ते सगळे विविध दिशांनी चित्रीकरणाला सुरुवात करतात. संगणकाच्या माध्यमातून हे चित्रीकरण असे काही जोडल्या जाते की पाहणाऱ्याला आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा आभास निर्माण होतो. जणू काही आपण त्या गल्लीतून चालतोय किंवा पायऱ्या चढतोय्! विशेष म्हणजे ताजच्या सर्व भागांमध्ये जाण्याची सामान्यांना परवानगी नाही मात्र, गुगल ट्रेकरला कोणतीही बंदी नाही.

सुरक्षेचा प्रश्न
गुगल ट्रेकरमुळे वास्तूच्या सुरक्षेला धोका पोहोचण्याची चिन्हे आहेत अशी ओरड या उपक्रमाची घोषणा होताच होऊ लागली. मात्र पुरातत्त्व विभाग आणि गुगल यांच्या मते अशा प्रकारचा कोणताही धोका यातून निर्माण होणार नाही. याबाबतची योग्य ती काळजी यामध्ये घेण्यात आलेली आहे, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात गुगलच्या या स्ट्रीट व्ह्य़ूला अमेरिकेत मोठय़ा प्रमाणावर विरोध झाला होता. यानंतर त्यांना काही भागांतून माघार घ्यावी लागली होती.

स्ट्रीट व्ह्य़ू ट्रेकर काय आहे ?
या तंत्रज्ञानामुळे आपल्याला वास्तू आतून बाहेरून पाहता येते. त्यामुळे प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणीच आहोत, असा भास होतो. यापूर्वी पॅरिसचे आयफेल टॉवर, अमेरिकेतील ग्रँड कॅनयॉन व जपानमधील फुजी पर्वतासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. गुगल इमॅप्स, द वर्ल्ड वंडर्स साइटवर हे ऑनलाइन प्रदर्शन पाहावयास मिळेल.

ताजमहाल, खजुराहोचे शिल्प घरबसल्या प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव आता आपल्याला मिळणार आहे. भारतीय पुरातत्त्व खाते आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील १०० राष्ट्रीय प्राचीन वास्तू सर्वागीण (३६० डिग्री) ऑनलाइन व्ह्य़ूमध्ये पाहणे शक्य होणार आहे. यासाठी स्ट्रीट व्ह्य़ू ट्रेकर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

Raigad is also now can be seen in 360 view
Exit mobile version