ऑर्कूट होतय आजपासून कायमच बंद

एकेकाळी तूफान क्रेझ असलेल सोशल नेटवर्किंग माध्यम ऑर्कूट आजपासून बंद होत आहे.
फेसबूक ट्वीटर सारखी नवीन माध्यमे ऑर्कूटच्या ह्या अवस्थेस कारणीभूत ठरली. ऑर्कूटनेही काही अर्थाने स्वतः अजिबातच सुधारणा न केल्याचाही हा परिणाम आहेच.
याआधीच्या काळात स्क्रॅप्स आणि टेस्टीमोनियल्स सर्रास वापरले जायचे ज्याची जागा आता लाइक आणि कमेन्टने घेतलीये. तब्बल एक दशकभर ऑर्कूट सुरू राहिलं. अनेकांच्या प्रेमविषयी आठवणी यामुळेच मांडता आल्या. आजच्या फेसबूकसारखीच अॅडिक्शन ऑर्कूटचीही होती. पण प्रत्येक गोष्टीला अंत असतोच. असो  

जर तुम्ही आधी ऑर्कूट वापरत असाल तर गूगलने तुमचा डाटा सेव करण्याचा ऑप्शन दिला आहे जो फक्त आजपर्यंतच उपलब्ध आहे
हा डाटा झिप फाइल मध्ये साठवून ठेवता येईल. त्यासाठी गूगल ऑर्कूट टेकआऊट पेज वर जाऊन  सर्व फोटोज व इतर माहिती डाऊनलोड करून घेता येईल.
मराठीटेकचा ऑर्कूटवरील आधीचा लेख वाचा ह्या लिंक वर सोशल मीडियातून ऑर्कूट आऊट

अलविदा ऑर्कूट !
  

Exit mobile version