ऑक्टोबर महिन्यात एलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून अनेक बदल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वीच एका ट्विटमध्ये ट्विटरचं सर्व सोयी देणाऱ्या एकाच ॲपमध्ये (The Everything App) रूपांतर करणार असल्याचं सांगितलं होतं. आता आजपासून नव्या लोगोमुळे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. X Corp. कंपनीने त्यांच्या ट्विटरचा लोगो निळ्या चिमणी ऐवजी आता 𝕏 (X) असा बदलला आहे. नवा लोगो वेबसाइटवर दिसू लागला आहे.
इलॉन मस्ककडे गेली अनेक वर्षं X.com या डोमेनची मालकी आहे. काही दिवसांपासून हे डोमेन ट्विटरकडे रिडायरेक्ट करण्यात आलं आहे.
ट्विटरची मालकी असलेल्या X Corp च्या सध्याच्या CEO Linda Yaccarino यांनीही याबद्दल ट्विटद्वारे माहिती दिली आहे.