फ्लिपकार्ट आणि त्यांचा बिग बिलियन उपद्याप

गेल्या काही दिवसांपासून चर्चा व जाहिराती सुरू असलेला फ्लिपकार्ट या भारतातील आघाडीच्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट आज बिग बिलियन डे नावाचा खास ऑफर्स दिवस होता. प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया वरती बरीच ऑफर आतषबाजी फ्लिपकार्टने आज केली. जसे की 16 जीबी pendrive केवळ 1 रुपयामध्ये ! किंवा जेबीएलचा 4500 चा हेडफोन 99 रुपयात , आशा अनेक discount मुळे अनेक ग्राहक आकर्षित झाले आणि सकाळी 8 वाजल्यापासून विकत घेण्याचे प्रयत्न केले. मात्र फ्लिपकार्टच्या निराशाजनक कारभारामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. 

हा मोठा सेल आज सकाळी 8 वाजता सुरू झाला आणि काही मिनिटातच ज्या डीलसाठी लोक वाट पाहत होते नेमकी ती सर्व आऊट ऑफ स्टॉक झाली. सकाळी 10 नंतर ज्यांनी डील्स पहाण्यासाठी फ्लिपकार्ट उघडल त्यांच्या पदरी तर आणखी निराशा पडली. नंतर नंतर तर चक्क फ्लिपकार्टचा सर्वर बंद पडू लागला. 
 त्याबरोबरच साइटबद्दलही अनेक तक्रारी येऊ लागल्या जसे की कार्ट मधील घेतलेल्या वस्तु आपोआप रीमूव होऊ लागल्या ऑर्डर आपोआप कॅन्सल होऊ लागल्या इ. 
यानंतर मात्र ग्राहकांचा पारा खवळला आणि बर्‍याच जणांनी ट्वीटर फेसबूकचा आधार घेऊन फ्लिपकार्टचा निषेध नोंदवायला सुरवात केली. सकाळी #flipkart चा ट्रेंड लवकरच #flopkart #failkart #fraudkart  अशा टॅग मध्ये बदलला. यावरून असे म्हणता येईल की आज फ्लिपकार्टने संतुष्ट ग्राहकांपेक्षा निसंतुष्ट ग्राहक मिळवले.  
फ्लिपकार्ट संस्थापक सीईओ सचिन बंसल मात्र असं म्हणत आहेत की bigbillionday हा यशस्वी झालाय आणि त्याने भारतीय इ शॉपिंगमध्ये इतिहास घडवलाय. सचिन बंसल यांना खरच तो इतिहास कोणत्या प्रकारचा आहे ते तपासून पहायला हवे. 
या सर्व गोंधळात SnapDeal, eBay, Amazon सारख्या इतर वेबसाइटनी फ्लिपकार्टच्या नाराजीचा फायदा घेत विक्री वाढवली. आणि चक्क #CheckSnapdealToday #AsliDealsONeBay ह्या टॅग ट्रेंडिंग झाल्या
               

अपडेट : फ्लिपकार्टने झालेल्या प्रकाराबद्दल ग्राहकांना ईमेल पाठवून माफी मागितली आहे .
पूर्ण इथे वाचता येईल http://blog.flipkart.com/apologies-from-flipkart/ 

Exit mobile version