व्हॉटसअॅप : नवीन व्हर्जन नवीन फीचर्स

                      व्हॉटसअॅप हे जगातलं सर्वात प्रसिद्ध मेसेजिंग अॅप. ज्याचे दिवसाला 500,000,000 पेक्षा अधिक अॅक्टिव यूजर्स आहेत, 700 मिलियन फोटो आणि 100 मिलियनपेक्षा अधिक विडियोज दररोज व्हॉटसअॅपवरुन शेअर केले जात आहेत. इतका प्रचंड आवाका असलेल्या व्हॉटसअॅपला फेसबुकने विकत घेतल्यावर सर्वत्र एकच ओरड सुरू झाली. आता व्हॉटसअॅपवर Ads सुरू होणार, प्रायवसी राहणार नाही, इ.
मात्र तरीही व्हॉटसअॅपने या गोष्टींकडे न लक्ष देता अधिकाधिक फीचर्स देण्यावर भर दिला आहे .

नोवेंबर महिना हा तर या फीचर्ससाठी अगदी मुहूर्त ठरवल्यासारखा झालाय, कारण या महिन्यात व्हॉटसअॅपने इतकी नवीन फीचर्स आणली आहेत की जवळपास रोज एक नवीन फीचर मिळत आहे.
यात महत्त्वाची सुविधा म्हणजे आपण पाठवलेला मेसेज ज्याला पाठवला आहे त्याने वाचला आहे की नाही ते समजेल. व्हॉटसअॅपच्या लास्ट सीन ह्या सुविधेने काय कमी प्रेमभंग होत होते म्हणून आता हा ऑप्शन आलाय अशा पद्धतीचे विनोद सुद्धा सध्या फिरत आहेत. हा मुद्दा इतका चर्चिला गेला की सलग तीन दिवस #whatsapp ही हॅशटॅग ट्रेंडिंग होती.

व्हॉटसअॅपने अधिकृतरीत्या जाहीर केलं आहे की व्हॉटसअॅप हे भारतीयांसाठी फ्री उपलब्ध आहे 

(ही घोषणा फक्त भारतापुरतीच आहे, भारतात पेमेंटसाठी अद्याप जास्त पर्याय नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे)

आता आपण व्हॉटसअॅपवरती नव्याने आलेली अशी फीचर्स आणि ती कशी वापरायची ते पाहू

पर्सनल मेसेजमधील नवीन सुविधा 

  1.  आपण ज्या व्यक्तिला मेसेजमधून इमेज, विडिओ,पाठवला आहे त्याच्या प्रोफाइलवर गेल्यास आपणा दोघांमध्ये शेअर झालेल्या मीडिया फाइल्स एकाच ठिकाणी दिसतील 
  2. एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाइलवर गेल्यास त्याचा व्हॉटसअॅप नंबर व त्याचे फोनमध्ये स्टोर असलेले इतर नंबरसुद्धा दिसतील 
  3. एखाद्याची प्रोफाइल पाहत असताना ऑप्शन की प्रेस केल्यास View In Address Book व Pay for a friend असे ऑप्शन आहेत  
  4. ज्या व्यक्तीची प्रोफाइल आपण पाहत आहोत त्याने त्याचा स्टेटस किती वेळापूर्वी बदलला आहे ते सुद्धा दिसेल
  5. ऑडिओ रेकॉर्ड आणि फोटो सेंड करण्यासाठी इन्स्टंट ऑप्शन कीबोर्ड शेजारीच 
  6. सिलेक्ट केलेला मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी किंवा व्हॉटसअॅपच्या बाहेर शेअर करण्यासाठी वेगळे ऑप्शन  
  7. आपण ज्या व्यक्तिला मेसेज पाठवला आहे त्याने तो मेसेज वाचल्यास २ निळ्या टिक्स दिसतील  (एरवी मेसेज पाठवल्यास १ टिक आणि मेसेज त्यांच्या फोन मध्ये deliver झाल्यास २ काळ्या टिक्स दिसतात)
  8. पाठवलेला मेसेज कधी deliver झाला आणि कधी वाचला गेला तेही समजेल 
  9. सर्व कॉन्वरसेशनच एकदम बॅकअप घेण्याची व क्लियर करण्याची सोय 
  10. सर्व कॉन्वरसेशन एकाच क्लिकवर Archive करण्याची सोय 

ग्रुप मेसेजमधील नवीन सुविधा ::

  1. ग्रुपच्या सदस्य संख्येत वाढ होऊन आता थेट १०० जणांचा व्हॉटसअॅप ग्रुप बनवता येईल                       ( Maximum Number of Group Members is now 100)
  2. ग्रुपला एकापेक्षा जास्त अॅडमिन करता येतील (A group can have more than one group admin)
  3. आता आपण ग्रुपमध्ये टाकलेला मेसेज कोणकोणत्या ग्रुप मेंबर्सने वाचला आहे ते देखील समजेल  (Now  we can figure out which group members read our message that was posted in the group also)
  4.  ग्रुपच्या नावाखाली ज्याने ग्रुप बनवला आहे त्याचे नाव व ग्रुप कधी बनवला गेलाय ती तारीख सुद्धा दिसेल 
  5. ग्रुपमध्ये शेअर केली गेलेली सर्व मीडिया फाइल एकाच जागी पाहता येतील ग्रुप नावच्या खाली असलेल्या “Media” या ऑप्शनने 
  6. जो ग्रुप मेंबर टाइप करत आहे त्याचे नाव ग्रुपच्या नावाखाली – is typing … असे दिसेल 
  7. सर्व कॉन्वरसेशनच एकदम बॅकअप घेण्याची सोय 
  8. सर्व कॉन्वरसेशन एकाच क्लिकवर Archive करण्याची सोय     
  9. End to End encryption सोबत मेसेजेस अधिक सिक्युर 
सेटिंग्समधील नवीन ऑप्शन :: 
  1. आपल्या Contacts मधील कोणत्याही मित्राचे  व्हॉटसअॅपचे सर्विस भाडे आपल्या खात्यावरून देता येईल 
  2. आपला जुना नंबर बदलून नवीन नंबर करता येईल आपले मेसेज व सर्विस कालावधी तोच राहील 
  3. प्रायवसी सेटिंग्स मध्ये प्रोफाइल पिक्चर, लास्ट सीन आणि स्टेटस लपवता येण्याची सुविधा (किंवा काही ठराविक Contacts नाच दिसेल अशी सुद्धा सुविधा ) 
  4. Network Usage या ऑप्शन मध्ये आपण पाठवलेले मेसेज, आपल्याला आलेले मेसेज यासाठी लागलेला डाटा या सर्वांची माहिती मिळेल तीही अगदी अचूक …. :
व्हॉटसअॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक्स 
वरील लेखाबाबतीत काही शंका असल्यास खालील कमेन्ट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता 
Exit mobile version