अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सरतेशेवटी व्हॉट्सॲप आता ॲपलच्या आयपॅड्सवरसुद्धा वापरता येणार आहे. आजच त्यांनी ॲप स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध करून दिलं असून त्याची लिंक खाली दिली आहे. आता तुम्ही आयपॅडच्या मोठ्या स्क्रीनवर तुम्ही ३२ लोकांसोबत व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल करू शकता, स्क्रीन शेअर करू शकता आणि दोन्ही फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्यांचा उपयोग करून संवाद साधू शकता.
WhatsApp for iPad Download Link : https://itunes.apple.com/app/id310633997
WhatsApp ने iPad साठी खास डिझाईन केलेल्या मल्टिटास्किंग सोयीमुळे तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी सहज करू शकता. Stage Manager*, Split View आणि Slide Over सारख्या iPadOS मधील फीचर्सचा यासोबतही वापर करता येईल.

या नवीन WhatsApp आवृत्तीत मल्टी-डिव्हाईस टेक्नॉलॉजीचा वापर करून तुमचे मेसेज, कॉल्स आणि मीडिया iPhone, Mac आणि इतर डिव्हाईसेसवर पूर्णपणे Sync होत राहतात. महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह सुरक्षित असते.
प्रायवसीसाठी ‘चॅट लॉक’ची सोय मिळणार आहे. जेणेकरून iPad इतरांसोबत शेअर करत असतानाही तुमचे संभाषण गोपनीय असेल.