अॅपल आयफोन 6S आणि 6S प्लस सोबत iPad Pro सादर

अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेला आयफोन आला आला म्हणत परवा अॅपलतर्फे त्यांच्या सप्टेंबर कार्यक्रमात सादर झाला. सोबत नवाकोरा आयपॅड प्रो, अॅपल टीव्हीसाठी खास ओएस, अॅपल वॉचसाठी नव्या सुविधा, अॅपल पेन्सिल अशी प्रॉडक्ट दाखवण्यात आली. सॅन फ्रान्सिस्को मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात अॅपलने अनेकांना मोठे धक्के दिले आहेत. यामधील सर्वांची माहिती घेऊया आजच्या या लेखात…
सर्वप्रथम आयफोन बद्दल 
आयफोन 6S व आयफोन 6S प्लस 
लेटेस्ट आयफोन्स 
  • 3डी टच  : आपल्या बोटाच्या दाबावर क्रिया (खास वैशिष्ट्य) 
  • 64 bit ए९ चीप : अधिक वेगवान क्रियांसाठी 
  • १२MP कॅमेरा : 4K विडियो शूटिंग क्षमता सोबत फ्रंट कॅमेरा 5MP आणि फ्रंट+बॅक दोन्हीकडे फ्लॅश  
  •  नवा टच आयडी : बोटाचा ठसा ओळखून लॉक काढण्याची सोय 
  • 300mbps इंटरनेट स्पीड असलेल 4G LTE  
  • किंमत : 6S $199 पासून सुरू (कॅरियर नेटवर्कसोबत असलेली किंमत)  
  • किंमत : 6S प्लस $299 पासून सुरू (कॅरियर नेटवर्कसोबत असलेली किंमत)           

 जरी ह्या फोनमध्ये 3D टचची सुविधा असली तरी ही सुविधा असलेला फोन काहीच दिवसांपूर्वी Huawei या चीनी कंपनीने आणला आहे. याशिवाय या फोनमध्ये नवं असं काहीच नाही. याबद्दल ग्राहकांत नाराजी आहे. त्याबद्दल लेखाच्या शेवटी बोलू… 

आयपॅड प्रो   
आयपॅड प्रो 
  • 12.9″ स्क्रीन असलेला मोठा आयपॅड !
  • 2732 x 2048 रेजोल्यूशन 
  • 10 तासांची बॅटरी लाइफ 
  • मल्टीविंडो सुविधा : एका बाजूला एक असे दोन App एकदम वापरता येणार 
  • 8MP कॅमेरा 
  • ताकदवान 4 स्पीकर्स सोबत टच आयडी 
  • कीबोर्ड साठी नव्या पोर्टचा समावेश 
  • किंमत : $799 For 32GB Model (Approx. रु.53000)  

अॅपल पेन्सिल   

  • आयपॅड वर काम करण्यासाठी नव्या स्टायलसचं लौंचिंग 
  • अचूक टच सोबत चित्रे आकृत्यांसाठी सुयोग्य 
  • अगदी प्रत्येक पिक्सेलपर्यन्त अचूक असल्याचा अॅपलचा दावा !
  • पेन्सिलच्या दाबासोबत अॅंगलदेखील परिणाम करेल!  
  • किंमत 99$ (~रु. ६५००)!  
  • मुळात काही वर्षांपूर्वी स्टीव जॉब्सनं स्टायलसलाच कडाडून विरोध केला होता !
  • सोबत नवा कीबोर्ड देखील … त्यासाठी नव्या फोर्टची सोय

अॅपल टीव्ही 

अॅपल टीव्ही आणि रीमोट
  • नवा टीव्ही सेटटॉपबॉक्स सादर 
  • अनेक apps सोबत नव्या पार्टनर्सचा समावेश 
  • बर्‍याच गेम्स डेवलपरसोबत बसून खास टीव्हीसाठी नव्या गेम्स 
  • सिरी या वाइस असिस्टेंटला टीव्हीशी जोडलय ज्यामुळे वॉइस कमांडद्वारे टीव्ही कंट्रोल करता येईल 
  • नवा टच असलेला रीमोट : टचचा वापर करून मेनू नॅविगेशन 
  • किंमत $149 (~रु ९८००)!      

  अॅपल वॉच 

  • अॅपल वॉचसाठी नवीन बेल्ट्स 
  • दोन नव्या कलरमध्ये उपलब्ध 
  • आता नव्या ओएस अपडेटमुले फेसबूकदेखील घड्याळात वापरता येणार !
सारांश : – 

आता वळूया कशी अॅपलने स्टीव जॉब्सच्या नियमांची पायमल्ली केली त्याकडे … 

काही वर्षांपूर्वी अथवा प्रथमपासूनच स्टीव जॉब्सचं काही गोष्टीबद्दल ठाम मत असायचं जसे की 
  1. फोनची स्क्रीन 4.7″ इंचापेक्षा जास्त नसावी (आता आयफोन 6S प्लसची स्क्रीन 5.5″ आहे!)
  2. आयपॅडसाठी 10″ ही साइज योग्य आहे (आता 12.9″ आयपॅड आलाय)
  3. अॅपलने wearable (स्मार्टवॉच, इ.)च्या क्षेत्रात उतरू नये. (आता अॅपल वॉच बाजारात उपलब्ध!)   
  4. स्टायलस हे खूप मोठ अपयश आहे (आता अॅपलने स्वतः स्टायलस आणून त्याला पेन्सिल नाव दिलय!)
अॅपल सीईओ टिम कूक भलामोठ्या आयपॅड सोबत 

स्टीवच्या निधनानंतर अॅपलमध्ये अश्या प्रकारच्या गोष्टी घडू लागल्याने गुंतवणूकदारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यात यापैकी कोणत्याही प्रॉडक्टमध्ये नवं काहीच नाही. यात भर म्हणून अॅपल कार बनवत नसल्याचं सांगताना केलेल्या विनोदामुळे तर शेअर मार्केटमध्ये अॅपलच्या शेअरमध्ये अजूनच घसरण झाली! इतक्या वर्षात अॅपलचा इवेंट सुरू असताना असं प्रथमच घडलं असावं! आयपॅड/आयफोन यांच्या नव्या मॉडेल्समध्ये अजिबात नावीन्य नाहीये. आयपॅडचा कीबोर्डतर मायक्रोसॉफ्टच्या सर्फेसची चक्क कॉपी आहे असं ग्राहकांचं ठाम मत बनलं आहे. जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीची अधोगती सुरू होण्याची तर ही लक्षण नाहीत ना ? असा प्रश्न विचारला गेला तर नवल वाटावयास नको…        

      
Exit mobile version