CES 2016 : सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी मेळयाविषयी …

या वर्षीचा CES कार्यक्रम लास वेगास मध्ये भरला असून नेहमीप्रमाणे सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये  आपापली उत्पादने सादर करण्यासाठी जोरात स्पर्धा दिसून येत आहे …

दिवस १ : ०६ जानेवारी

  1. नेटफ्लिक्स (Netflix) भारतात उपलब्ध, ऑनलाइन टीव्ही कार्यक्रम, चित्रपट यांचा प्रचंड मोठा साठा, मासिक रु. ५०० पासून प्लॅन सुरू. (शो पहाण्यासाठी इंटरनेट आवश्यक!) भारतासारख्या देशात पायरसीला आळा घालण्याच्या दृष्टीने पहिलीच मोठी कंपनी भारतात ! सोबत १३० देशांत विस्तार! 
  2. Oculus Rift VR हा हेडसेट जो घरबसल्या आपल्याला आभासी अनुभव देईल त्याची प्री-बूकिंग सुरू किंमत $599 (रु.~३०,०००)
  3.  कोडॅकचा 4K अॅक्शन कॅमेरा : 2880 x 2880 चं रेजोल्यूशन किंमत $500
  4. टीपी-लिंक : जगातला पहिला 802.11ad राऊटर, 7.2Gbps स्पीड !      
  5. सोनी : अनेक टीव्हीची मालिका सोबत अँड्रइड टीव्ही, 4K डिस्प्लेची सुविधा,ब्लु रे प्लेयर, हॅंडीकॅम सोबत 20X झुम आणि 4K शूटिंग      
  6. वॅकॉम(wacom) चा नवा सर्फेस पद्धतीचा स्टायलस 
या सोबतच लेनेवोने नवा स्वस्तात मस्त फोन सादर केलाय 
Lenovo K4 Note :   5.5″ फुलएचडी , 441ppi,रॅम 3GB , स्टोरेज 16GB (up to 128GB expandable), Android 5.1, कॅमेरा : 13MP+5MP, ३३००mAh बॅटरी, फिंगरप्रिंट सेन्सर, किंमत ११,९९९      
असुसने देखील Zenfone Max नावाचा हँडसेट सादर केलाय. 
Asus Zenfone Max : 5.5″ एचडी, रॅम 2GB , स्टोरेज 16GB (up to 128GB expandable), Android 5.1, कॅमेरा : 13MP+5MP, बॅटरी 5000mAh(सामान्य मोबाइलच्या दुप्पट!), किंमत रु.९,९९९  
ही पोस्ट कार्यक्रम संपेपर्यंत अपडेट केली जाईल  
Exit mobile version