मोटो G4, G4 Plus आणि G Play सादर

अनेक महिन्यांपासून मोटो फोन्सचे चाहते वाट पाहत असलेला मोटो G4 आज अखेर सादर करण्यात आला. मोटो फोन्स आता लेनेवो कंपनीच्या मालकीचे आहेत (यापूर्वी मोटोरोला त्यानंतर गूगल आता लेनेवो). आश्चर्य म्हणजे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन फोन एकाच वेळी सादर केले आहेत !
जाणून घेऊया या तिन्ही फोन्सच्या फीचर्सबद्दल …
लेनेवो मोटो G4  

मोटो G4 :

  • डिस्प्ले : 5.5 इंच फुल एचडी स्क्रीन 401ppi  
  • ओएस : अँड्रॉइड मार्शमेलो ६.०.१  
  • प्रॉसेसर : क्वालकॉम  स्नॅप ड्रॅगन 617 ओक्टा कोर 
  • कॅमेरा : 13MP F/2.0 दोन एलईडी आणि मागचा 5MP F/2.2  
  • रॅम-स्टोरेज  :2GBरॅम-16GB किंवा 32GB  सोबत SDकार्ड सपोर्टसुद्धा 
  • बॅटरी : 3000mAh टर्बो चार्ज सुविधा – 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 6 तास चालेल!   
  • इतर :  4G ड्युल सिम  
  • किंमत : अद्याप जाहीर नाही 
लेनेवो मोटो G4 प्लस   

मोटो G4 Plus :

  • डिस्प्ले : 5.5 इंच फुल एचडी स्क्रीन 401ppi
  • ओएस : अँड्रॉइड मार्शमेलो ६.०  
  • प्रॉसेसर : क्वालकॉम  स्नॅप ड्रॅगन 617  ओक्टा कोर 
  • कॅमेरा : 16MP F/2.0 दोन एलईडी आणि मागचा 5MP F/2.2  
  • रॅम-स्टोरेज  : 4GBरॅम-64GB किंवा 3GBरॅम-32GB किंवा 2GBरॅम-16GB सोबत SDकार्ड सपोर्टसुद्धा 
  • बॅटरी : 3000mAh   टर्बो चार्ज सुविधा – 15 मिनिटांच्या चार्जिंगवर 6 तास चालेल!  
  • इतर : फिंगरप्रिंट सेन्सर, 4G ड्युल सिम
  • किंमत : १३,४९९ / १४,९९९ 
लेनेवो मोटो G Play 

मोटो G Play :    

  • डिस्प्ले : 5.0 इंच एचडी स्क्रीन 294ppi  
  • ओएस : अँड्रॉइड मार्शमेलो ६.०.१   
  • प्रॉसेसर : क्वालकॉम  स्नॅप ड्रॅगन 410 क्वाड कोर 
  • कॅमेरा : 8MP ƒ/2.2 आणि मागचा 2MP  ƒ/2.2  
  • रॅम-स्टोरेज  : 2GBरॅम-16GB सोबत SDकार्ड सपोर्टसुद्धा 
  • बॅटरी : 2800mAh    
  • इतर : 4G ड्युल सिम
  • किंमत : अद्याप जाहीर नाही 

मोटो G Play फोन हा कमी किंमतीचा असून जुन्या फोन्समध्येच सुधारणा करून नवं अँड्रॉइड दिलं गेलं आहे.

सध्या १५००० ते २५००० किंमतीच्या फोन्सच्या बाजारात प्रचंड मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. असुस, शायोमी, मैझू, ले एको, वनप्लस, लेनेवो, ओप्पो, हुवावे, कुलपॅड हे चीनी ब्रॅंड शिवाय भारतीय मायक्रोमॅक्स, यु,  इंटेक्स इ ब्रॅंड तर आहेतच !  मोटो G फोन्समुळे चांगलच यश मिळालं आहे. त्यामुळेच तीन फोन सादर करून बाजारावर वर्चस्व गाजवण्याचा हा लेनेवोचा प्रयत्न आहे.      

मोटो G4 लॉंच व्हिडिओ लिंक : मोटो G4

Exit mobile version