व्हॉटसअॅप आता कम्प्युटरवर !

व्हॉटसअॅप कम्प्युटरवर वापरण्यासाठी दोन ऑफिशियल पर्याय :

  • व्हॉटसअॅप वेब : ह्या पर्यायामध्ये आपण ब्राऊजरमधून web.whatsapp.com ही लिंक उघडून नंतर आपल्या फोन मधून QR कोड स्कॅन करून व्हॉटसअॅप ब्राऊजरमध्ये वापरू शकतो ! ह्या पर्यायाला ब्राऊजर (उदा. क्रोम) वापरावाच लागतो !
  • व्हॉटसअॅप डेस्कटॉप अॅप्लिकेशन : ह्या पर्यायामध्ये आपल्याला सॉफ्टवेअर डाऊनलोड (लिंक) करून इंस्टॉल करावे लागते. त्यानंतर फोनमध्ये QR कोड  स्कॅन करावा लागतो. आणि एमजी वापरण्यास तयार.  मात्र ह्या पर्यायाला ब्राऊजरची गरज नाही! तसेच ह्या पर्यायामध्ये आपण कीबोर्ड शॉर्टकट वापरू शकतो आणि नोटिफिकेशन मिळवू शकतो !   (ह्याचा तोटा म्हणजे ह्यासाठी डिस्कवर जागा जाईल आणि रॅम सुद्धा वापरली जाईल) 

टीप : हे दोन्ही पर्याय वापरण्यासाठी व्हॉटसअॅप फोनवर इंस्टॉल असावे लागेल तसेच ह्यांचा वापर करताना फोनमधील इंटरनेट सुद्धा चालू असावे लागेल ! खरेतर ह्यांचा उपयोग केवळ फोनमधील मेसेज जसेच्या तसे दिसण्यासाठीच होतोय. केवळ पीसीवर व्हॉटसअॅप वापरण्यासाठी व्हॉटसअॅपतर्फे सध्यातरी सोय नाही! (तुम्ही Virtual OS चा वापर करून BlueStacks सारख्या सॉफ्टवेअरवर व्हॉटसअॅप वापरू शकता तेही फोनशिवाय !)    

Exit mobile version