रिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन? फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट!

 

रिलायन्सने बहुचर्चित 4G फीचर फोन मुंबई येथे वार्षिक कार्यक्रमात सादर केला आहे. हा मेड इन इंडिया फोन असणार असून फीचर फोन्सच्या विश्वात क्रांती घडवेल असं मुकेश अंबानी यांनी यावेळी सांगितलं. या नव्या 4G फोनद्वारे भारतातील सर्व गावे, शहरे 4G इंटरनेटद्वारे जोडण्याचा संकल्प बोलून दाखवला.

या JioPhone (जिओफोन) ची किंमत चक्क शून्य रुपये असेल असं जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यासाठी १५०० रुपये सुरक्षा डिपॉजिट मात्र द्यावं लागेल. हे डिपॉजिट तीन वर्षांनी जिओला फोन परत देऊन मिळवता येईल! याचा अर्थ हा फोन मोफतच मिळाल्यासारखा आहे! दरम्यान या फोनसाठी खास प्लॅन्ससुद्धा सादर केले गेले असून मुख्य प्लॅन ज्यामध्ये दर महिना केवळ ₹१५३ रुपयांमध्ये अमर्यादित फोन कॉल्स, इंटरनेट व एसएमएस मिळतील! (दररोज 500MB हाय स्पीड डेटाची FUP)
या मुख्य प्लॅन व्यतिरिक्त दोन छोटे पॅक (Sachet) जे ₹५३ रुपयात एक आठवडा आणि ₹२३ रुपयात दोन दिवस अशा वैधतेमध्ये (Validity) उपलब्ध असतील.

ह्या फोनसाठी २४ ऑगस्ट २०१७ पासून बुकिंग सुरू होईल! (चाचणी/टेस्टिंगसाठी १५ ऑगस्टपासून उपलब्ध)
 यानंतर सप्टेंबर पासून ज्यांनी बुकिंग केलं आहे त्यांना फोन मिळायला सुरूवात होईल. बुकिंग MyJio अॅप द्वारे किंवा जिओ केंद्राला भेट देऊन करता येईल.

फोनमधील सुविधा :

  • अल्फान्युमरिक किबोर्ड
  • 2.4 इंची QVGA डिस्प्ले
  • 4G VoLTE नेटवर्क
  • ओएस : KAI OS
  • SD मेमरी कार्ड स्लॉट 
  • टॉर्च लाइट, २२ भारतीय भाषांना सपोर्ट 
  • वायरलेस एफएम रेडियो
  • Processor (CPU): 1.2GHz Dual Core
  • Chipset: SPRD 9820A/QC8905
  • Graphics (GPU): Mali-400 @ 512MHz
  • रॅम : 512MB स्टोरेज : 4GB
  • बॅटरी 2000mAh 
  • कॅमेरा : 2MP , Front 0.3MP
  • सोबत Jio Apps (Jio Music, Jio TV and Jio Cinema)
  • हेडफोन जॅक, माइक, स्पीकर
  • वॉइस कमांड (आवाजाद्वारे नियंत्रण)
  • इंटरनेटवर शोध/सर्च 
  • लवकरच NFC सपोर्ट सुद्धा दिला जाईल ज्यामुळे पैसे देताना/Payment मोबाइलचाच वापर करता येईल!
    यामध्ये जिओफोनला बँक अकाउंट, जनधन खातं, UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड जोडता येतील!  
  • कोणत्याही टीव्हीला जोडून कार्यक्रम/चित्रपट पाहता येतील! अगदी जुन्या CRT टीव्हीला सुद्धा!
    मिरर नावाची हि सोय फोनमधील व्हिडीओ टीव्हीवर दाखवतो! (यासाठी अतिरिक्त ₹३०९ चा पॅक)    
  • सुरक्षेसाठी 5 अंक बटन दाबून धरल्यास आपण सेट केलेल्या नंबरला आपोआप SMS जातो
    त्यात आपली लोकेशनसुद्धा समजते, जेणेकरून ती व्यक्ती मदतीला येऊ शकेल!
  • इतर : सिंगल सिम, VoLTE, Wi-Fi, NFC, Bluetooth 4.1, GPS, Wireless FM Radio, 720p Video Player
जिओने यावेळी त्यांनी 100 Million (दहा करोड) ग्राहकांचा टप्पा ओलांडला असल्याचं सुद्धा जाहीर केलं! जिओचे ग्राहक सध्या 125 करोड GB डाटा वापरत आहेत असंसुद्धा अंबानींनी सांगितलं! या फोनविषयी तांत्रिक माहिती सांगण्यात आलेली नाहीये. या फोनची किंमत आणि यामधील सोयी पाहून ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभेल हे नक्की !

जिओफोन बुक कसा करायचा
JioPhone PreBooking

ऑनलाइन पद्धत –

  1. jio.com या वेबसाइट वर जा 
  2. २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.३० वाजता ह्या फोनची बुकिंग सुरू होईल
  3. यासाठी नोंदणी करताना तुमचा मोबाइल क्रमांक, पिनकोड, ५०० रु यांची गरज असेल.
  4. ५०० रु ऑनलाइन द्यावे लागतील. (नेटबँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/पेटीएम/यूपीआय) 
  5. उर्वरित १००० रु फोन मिळाल्यावर द्यायचे आहेत.  
  6. नोंदणीसाठी वेबसाइटप्रमाणेच तुम्ही MyJio अॅपचा सुद्धा वापर करू शकता. 

ऑफलाइन पद्धत –

  1. तुमच्या जवळ असलेल्या रिलायन्स जिओ स्टोअरमध्ये जाऊन फोन क्रमांक व ५०० रु देऊन नोंदणी करता येईल. मात्र यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळं ऑनलाइन पद्धतच स्वीकारा.

incoming search terms Reliance Jio JioPhone 4G pre book mukesh ambani VoLTE jiotv price

Exit mobile version