टेस्ला मोटर्सचा इलेक्ट्रिक सेमी ट्रक सादर! सोबत रोडस्टर २.० सादर!

टेस्ला मोटर्स या फक्त इलेक्ट्रिक कार्स बनवणार्‍या कंपनीने आज त्यांचा पहिला सेमी ट्रक सादर केला असून नव्या प्रकारचं वाहतूक साधन उपलब्ध करून दिलं आहे. इलॉन मस्क हे टेस्लाचे प्रमुख असून त्यांनी याविषयी घोषणा केली. सर्वात वेगवान इलेक्ट्रिक गाडी मॉडेल एस नंतर आता हा वेगवान तोही इलेक्ट्रिक असा ट्रक सादर करून ट्रक ड्राइव्हरना सुरक्षित, सहज चालवता येईल असा पर्याय मिळाला आहे. या ट्रक मध्ये ऑटो पायलट सुविधा सुद्धा असून ज्याद्वारे ट्रक ठिकाण सेट केल्यावर GPS व सेन्सरचा वापर करून स्वतः चालेल!

हा सेमी ट्रक एका चार्जवर तब्ब्ल ८०० किमी जाऊ शकतो. ० ते ६० mph (ताशी मैल) पकडायला केवळ ५ सेकंद लागतात. हाच वेग ३६००० किलो वजनासोबत २० सेकंदात पकडू शकेल! चालकांसाठी टच कंट्रोल्स, दोन मॉनिटर, एकच मध्यवर्ती आरामदायी सीट, बुगाटी चीरॉन या सुपरकारपेक्षा जास्त एरोडायनॅमिक!
३० मिनिटांच्या चार्जद्वारे ६३० किमी जाता येईल असे मेगाचार्जर सुरु करणार.

टेस्ला सेमी ट्रकचे अंतर्भाग ड्राइव्हर सीट 

याची बुकिंग सुरू झाली असून 5000$ देऊन बुकिंग करता येईल! २०१९ मध्ये उत्पादन सुरू होईल.

Tesla Roadster 2.0 

Roadster 2.0 याचवेळी अनपेक्षितपणे टेस्लाने त्यांची पूर्वीची प्रसिद्ध कार मॉडेल रोडस्टरचं नवं व्हर्जन सादर केलं! रोडस्टर २.० ही जगातली आजपर्यंतची सर्वात वेगवान प्रॉडक्शन कार आहे! नवी रोडस्टर ताशी ० ते १०० किमी वेग पकडायला केवळ १.९ सेकंद घेते! तर ० ते १६० किमी (100 mph) वेग पडकायला केवळ ४.२ सेकंद वेळ घेते. आजपर्यत कोणत्याही प्रोडक्शन कारला इतका वेग गाठता आलेला नाहीये! या कारचा टॉप स्पीड २५०+ mph! यामध्ये चार जण बसू शकतील, कन्वर्टिबल असल्यामुळे छत उघडता येईल! हि कार संपूर्ण इलेक्ट्रिक आहे. 200KWH बॅटरी पॅक, १००० किमी रेंज चालू शकेल! नवी रोडस्टर २०२० मध्ये उपलब्ध होईल. किंमत ~₹१,२९,७१,००० (जवळपास)

search terms tesla semi truck roadster 2.0 car electric fastest quickest production car ever
Exit mobile version