नोकिया 3310 4G जाहीर : आता वायफाय व 4G VoLTE सुद्धा!

Nokia 3310 4G  

नोकियाने काही महिन्यांपूर्वी सादर केलेल्या नोकिया 3310 च्या नव्या आवृत्तीमध्ये आता 4G जोडून नव्याने सादर करण्यात येत आहे! या नव्या सोयीमुळे या बेसिक फिचर फोन मधून आता VoLTE ऑडिओ कॉल्स करता येतील. आता वायफायची सुद्धा जोड देण्यात आल्यामुळे हॉटस्पॉट म्हणून सुद्धा वापरता येतो!

हा फोन सध्या चीनमध्ये सादर झालेला असून लवकरच मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये सादर केला जाऊ शकतो. त्यानंतरच भारतात उपलब्ध होऊ शकतो. किंमत सुद्धा नंतरच जाहीर केली जाईल. जिओ नोकियासोबत भागीदारी करून खास पॅक्स जोडून हा फोन भारतात सादर करणार असल्याची चर्चा आहे.

नोकिया 3310 4G सुविधा :
डिस्प्ले : 2.4-inch QVGA (240×320 pixels) screen
ओएस : YunOS (अलिबाबाची अँड्रॉइड आधारित कस्टम ओएस)
कॅमेरा : 2-megapixel camera with LED flash
नेटवर्क : 4G TD-LTE, वायफाय सपोर्ट, Support 4G hot spots
रॅम : 256MB,  स्टोरेज : 512 MB + 64 GB SD Card expansion
बॅटरी : 1200mAh
इतर : Bluetooth 4.0, Micro-USB, FM radio आणि MP3 player
किंमत :  (भारतीय किंमत जाहीर नाही)

search terms : nokia 3310 4G india mwc 2018 

Exit mobile version