सोनी Xperia XZ2 Premium सादर

गेली काही वर्षं सोनी स्मार्टफोन निर्मितीमध्ये बरीच मागे पडली आहे. काही स्मार्टफोन ट्रेंड्स जसे की Bezel-less (कमी कडा असलेले) डिस्प्ले जे आता जवळपास प्रत्येक कंपनीच्या फोन मध्ये पाहायला मिळतं मात्र सोनीने अद्याप त्या प्रकारचा डिस्प्ले असलेला फोन सादर केला नाहीय! आता हा नव्याने आलेला फोन ज्यामध्ये कॅमेरा, डिस्प्ले गुणवत्ता उत्कृष्ट असली तरी अधिक वजन, मोठ्या कडा यामुळे पुन्हा काही बाबतीत निराशाच केली म्हणावं लागेल. ही Xperia XZ अजूनही 4K कॅमेरा रेकॉर्डिंग आणि ते पाहता येणारा डिस्प्ले असलेली प्रमुख कंपन्यांमध्ये एकमेव फोन मालिका आहे!

यामधील कॅमेराचं वैशिष्ट्य म्हणजे कमी उजेडात फोटोसाठी यात ISO 51200 पर्यंत सेट करता येते आणि व्हिडिओसाठी सुद्धा ISO 12800 पर्यंत नेता येते! सोबत हा सोनीचा ड्युयल (पाठीमागे दोन) कॅमेरा असलेला पहिलाच फोन!
डिस्प्ले : 5.8″, 4K (2160 x 3840) HDR, Corning® Gorilla® Glass 5, TRILUMINOS

कॅमेरा : 19MP 1/ 2.3” Exmor RS आणि Black & White 12MP
Low-light photo: ISO 51200, Low-light video: ISO 12800, 4K HDR Movie recording
फ्रंट कॅमेरा : 13MP, 1/ 3,06” Exmor RS
रॅम : 6GB RAM, स्टोरेज : 64GB UFS + microSDXC support (up to 400GB)

ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉइड ओरीओ 8.0
प्रोसेसर (CPU) : Qualcomm Snapdragon 845
बॅटरी : 3540 mAh : Smart Stamina Qnovo Adaptive Charging Qualcomm Quick Charge 3.03
Wireless Charging (Qi)
वजन : 236g
इतर : Water resistant (IP65/68), NFC, USB 3.1 Gen1, Fingerprint Sensor, LDAC, Clear Audio+

Exit mobile version