पतंजली सिम कार्डस? नेमकं कोणासाठी?

कालपासून बर्‍याच बातम्यांच्या साईट/सोशल मीडियावर रामदेवबाबा यांच्या पतंजली कंपनीने टेलीकॉम क्षेत्रात पदार्पण केलं किंवा त्यांचे सिम कार्डस उपलब्ध होणार असा आशयाच्या बातम्या दिल्या होत्या. मात्र पतंजली तर्फे याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं असून ही नवी सिम कार्डस बीएसएनएल सोबत भागीदारी करून फक्त पतंजलीच्या कर्मचार्‍यांना आणि त्यांच्या संबंधित संस्थांनाच (किसान सेवा, युवा भारत, योग्य समिती, इ.) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या गोष्टीला पतंजलीने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला असं म्हणता येणार नाही. (अशा प्रकारची शीर्षकं वापरली गेली आहेत ती सुद्धा आघाडीच्या माध्यमांकडून!).

यामध्ये पतंजली कर्मचार्‍यांना १४४ रुपयात एक महिना रोज 2GB डाटा मिळेल. खरेतर याची माहिती फेब्रुवारीमध्येच बाहेर पडली होती. त्यामुळं आता पतंजलि स्वदेशी समृद्धी सिम सर्वांसाठी उपलब्ध होणार यामध्ये तूर्तास काहीही तथ्य नाही. सध्यातरी जिओच्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या स्पर्धेवरच ग्राहकांना अवलंबून राहावे लागेल.

फेब्रुवारीमधील ट्विट:  

कालचं ट्विट :

search terms patanjali sim cards ramdevbaba telecom sector 

Exit mobile version