अॅपल WWDC २०१८ : iOS 12, macOS Mojave अपडेट जाहीर!

अॅपलच्या WWDC म्हणजे Worldwide Developers Conference कार्यक्रमात सॉफ्टवेअर बाबतीत बर्‍याच नव्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यापैकी खास म्हणजे iOS, macOS, watchOS यांच्यासाठी नवे पर्याय. आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊया कोणत्या नव्या गोष्टी पाहता येतील.

iOS 12 : आयओएस ही ऑपरेटिंग सिस्टम आयफोन आणि आयपॅड टॅब्लेटसाठी काम करते. या नव्या अपडेट मध्ये iOS अधिक वेगवान केल्याचा दावा अॅपल केला आहे.     कॅमेरा स्वाईपद्वारे ७०% अधिक वेगात उघडेल. ५०% अधिक वेगात किबॉर्ड उघडेल आणि अॅप्स निम्म्या वेळात उघडतील!
FaceTime या व्हिडीओ चॅट सुविधेमध्ये एकाचवेळी  तब्बल ३२ जणांशी व्हिडीओ चॅट करता येईल!

Memoji

स्वतःची Animoji तयार करता येईल! : अॅनिमोजी नंतर आता स्वतःचा चेहरा ऍनिमेटेड स्वरूपात करता येणार आहे . याला अॅपलने मिमोजी (memoji) असं म्हटलं आहे! यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत! या मिमोजी चॅट दरम्यान सुद्धा वापरात येतील! Koala, tiger, ghost, T. rex यांच्या नव्या अॅनिमोजी देण्यात आल्या आहेत. आता सेन्सर डोळे, चेहरा यांच्याबरोबर जीभेची हालचाल सुद्धा दर्शवतील!

ARKit2 : ऑग्मेंटेड रियालिटी AR साठी नव्या सुविधा आता एकाच वेळी या आभासी जगात दोघांना समाविष्ट करता येणार आणि त्यांना त्या जगात एकमेकांशी संपर्क साधता येईल!
Group Notifications : iOS वर बऱ्याच जणांची मागणी असलेली ही सोया एकदाची उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फोटो शेअर : आता फोटो मध्ये असलेल्या व्यक्ती आपोआप ओळखून त्यांना फोटो पाठवण्याची सोय देण्यात आली आहे.
सिरी : सिरीला अनेक आज्ञा एकाच वेळी सेट करून त्यांना पुन्हा वापरताना एकाच कीवर्डद्वारे वापरता येईल!

macOS Mojave (मॅकओएस मोहावे) :  डार्क मोड ज्याद्वारे डोळ्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून सर्व मेन्यू काळ्या/गडद रंगात दिसतील, वेळेनुसार डिस्प्ले रंग बदलेल,  सोबत इतर अनेक लहान बदल. आता बाहेरून GPU/ग्राफिक्स जोडल्यास त्यासाठी ओएसमध्ये उत्तम सपोर्ट मिळेल त्यामुळे गेमिंग आणि एडिटिंग साठी उत्तम कामगिरी मिळेल!

watchOS आणि अॅपल TV साठी सुद्धा बरेच लहान मोठे नवे पर्याय देण्यात आले आहेत! आता दरवेळी हे सिरी म्हणण्याऐवजी केवळ हात उचलला तरी आपोआप कमांड्स ऐकेल! अॅपल टीव्हीवर आता 4K HDR  व्हिडीओ डॉल्बी ऍटमॉस साऊंड सह पाहता येतील!

Exit mobile version