MarathiTech - मराठीटेक
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
  • Home
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • गेमिंग
  • खास लेख
  • HowTo
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • टेक गुरु
    • बोर्डरूम
  • शॉपिंग ऑफर्स
No Result
View All Result
MarathiTech - मराठीटेक
No Result
View All Result
Home ऑपरेटिंग सिस्टिम्स Windows

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

Sooraj Bagal by Sooraj Bagal
November 1, 2025
in Windows, ऑपरेटिंग सिस्टिम्स
WIndows 11 Copilot Mico Clippy

मायक्रोसॉफ्टने Copilot चा नवीन Fall Release जाहीर केला आहे, ज्यात AI सहाय्यकाला जास्त मानवी, जास्त कामात येणारा व आपल्याशी नीट संवाद साधणारा बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
याचसोबत Windows 11 वर AI अनुभवांकडे लक्ष देऊन प्रत्येक Windows 11 PC ला एक AI PC बनवणे या दृष्टिकोनातून नवीन Agentic फीचर्स जाहीर झाले आहेत. याचाच भाग म्हणून पूर्ण ओएसमधील गोष्टी करण्यासाठी आपण आता Copilot ची मदत घेऊ शकतो!

आता विंडोज आणि Copilot द्वारे एक नवा Mico नावाचा Companion मिळणार असून हा एक blob आकाराचा असिस्टंट जो आपण ज्याप्रकारे बोलत आहोत त्याचा अभ्यास करून उत्तरे देतानासुद्धा वेगवेगळे हावभाव आणि आवाजात चढउतार करून उत्तरे देईल ! विशेष म्हणजे यामध्ये गंमत म्हणून त्यांनी जुन्या विंडोजमध्ये एकेकाळी उपलब्ध असलेल्या Clippy ला सुद्धा आणलं आहे. Mico च्या डिझाईनसाठी मिळणारे वेगवेगळे पर्यायांमध्ये Clippy सुद्धा मिळेल.

ADVERTISEMENT

Copilot Vision सारख्या सोयीमुळे आपण शब्दशः आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारून ती अडचण Copilot कडून दूर करून घेऊ शकतो!

Copilot Fall Release मधील मुख्य वैशिष्ट्ये या अपडेटमध्ये एकूण १२ मोठ्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. त्यातील काही महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे:

  • ग्रुप्स (Copilot Groups): ३२ लोकांसोबत एकत्र ब्रेनस्टॉर्मिंग करा. कॉपायलट चर्चा सारांश तयार करतो, त्यानुसार मते तपासतो आणि टास्क वाटप करतो. टीम वर्कसाठी परफेक्ट!
  • इमॅजिन (Imagine): एकमेकांच्या AI Generated Conntent आयडियाज एकत्र करा आणि रिमिक्स करा. कलाकुसर किंवा मार्केटिंग आयडियाजसाठी उत्तम.
  • रिअल टॉक (Conversation Styles): कोपायलट आता तुमच्या स्टाइलनुसार बोलतो. तो तुम्हाला उपयुक्त होईल अशा मार्गाने चर्चा करेल.
  • मेमरी अँड पर्सनलायझेशन (Memory & Personalization): कॉपायलट आता तुमची जुनी बोलणी आठवते – जसं ट्रेनिंग प्लॅन किंवा वार्षिकोत्सव. तुम्ही ते संपादित किंवा डिलीटही करू शकता. हे तुमचा ‘सेकंड ब्रेन’ सारखे आहे.
  • कनेक्टर्स (Connectors): वनड्राइव्ह, आउटलुक, जीमेल, गुगल ड्राइव्ह सारख्या अॅप्सशी जोडा. “माझी डेंटिस्ट अपॉइंटमेंट कधी?” असं बोलून विचारा आणि लगेच त्या App मध्ये माहिती अभ्यासून उत्तर मिळेल.
  • Proactive Actions : कोपायलट आता स्वतः सुचवतो की पुढे काय करायचं, जसं रिसर्चमध्ये नेक्स्ट स्टेप्स.
  • कॉपायलट फॉर हेल्थ (Copilot for Health): आरोग्य विषयक प्रश्नांसाठी विश्वसनीय माहिती (हार्वर्ड हेल्थवरून) आणि डॉक्टर शोधण्यात मदत. सध्या अमेरिकेत उपलब्ध.
  • लर्न लाइव्ह (Learn Live): अभ्यासासाठी व्हॉइस-बेस्ड ट्यूटर. स्वतःचा वैयक्तिक शिक्षक असल्याप्रमाणे आपल्याला प्रश्न विचारून शिकवतो, थेट उत्तर देण्याऐवजी तो विषय समजावून सांगतो.
  • Copilot Mode in Edge : ब्राउजरमध्ये AI द्वारे टॅब्स सारांश मिळवा, हॉटेल बुक करा किंवा फॉर्म भरायला लावा. आपल्या बोलण्याप्रमाणेनेही कृती करेल.
  • Copilot Pages and Copilot Search : एकाचवेळी अनेक फाइल्स अपलोड करा आणि त्या सर्वांचं एकत्र विश्लेषण AI मार्फत करून घ्या.

या फीचर्समुळे कोपायलट तुम्हाला मदत करेल पण हे करताना गरजेचा असलेला डेटा आणि इतर कंट्रोल तुमच्याकडे राहतो. हे अपडेट सुरुवातीला अमेरिका, यूके, कॅनडा येथे उपलब्ध होणार असून नंतर हळूहळू इतर ठिकाणी येईल.

विंडोज ११ वर एआय आणखी सोपे: नवे कोपायलट आणि Agentic Features : या रिलीजने प्रत्येक विंडोज ११ पीसीला एआय पीसी बनवलं आहे. तुम्ही “Hey Copilot” म्हणून बोलू शकता आणि तो तुमचं बोलण ऐकायला तयार होईल.

  • Copilot Vision आता जगभर उपलब्ध – आपली स्क्रीन पाहून टिप्स देणे, जसं रेझ्युमे मध्ये योग्य बदल करणे किंवा गेम खेळण्यात मदत.
  • टास्कबारवर असलेल्या नव्या Ask Copilot बटणाने एका क्लिकमध्ये एआय सुरू करा. लोकल फाइल्सवर अॅक्शन्स घ्या, जसं फोटोज सॉर्ट करा किंवा पीडीएफ वाचा.
  • Agentic फीचर्स मध्येही एआय तुमच्या परवानगीने काम करतो, जसं वेबसाइट तयार करणे, कोडचा अभ्यास करून bugs काढून टाकणे किंवा व्हिडिओ एडिट करणे. गेमिंगसाठीही कोपायलट बीटा उपलब्ध होतो आहे.

मायक्रोसॉफ्ट गेल्या काही दिवसात AI च्या शर्यतीत थोडंसं मागे पडत असल्याची जाणीव होताच भसाभस AI फीचर्स आणत आहे पण या सोयी उपयुक्त असल्या तरी एकाचवेळी अनेक नव्या गोष्टी आणि त्यात व्यवस्थित माहिती देणारं UI डिझाईन नसल्याने वापरकर्त्यांना अडचणीच्याच ठरणार आहेत. Copilot एज ब्राऊजरमध्येही उघडल्यावर बऱ्याच गोष्टी स्क्रीनवर दिसू लागतात ज्यांची त्यावेळी आपल्याला गरज नसते.

हल्ली ट्रेंडनुसार सगळ्याच गोष्टी AI AI AI म्हणत प्रत्यक्ष वापर आणि युजर्सना एकंदरीत AI फीचर्सची गरज याकडेही लक्ष द्यायला हवं. AI फीचर्सच्या नादात मूळ सॉफ्टवेअर/वेबसाइटचा वापर कोणत्या गोष्टीसाठी होतो तेच बाजूला गेल्यासारखं होईल…

Tags: AIClippyCopilotMicoMicrosoftOperating SystemsWindows 11
ShareTweetSend
Previous Post

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

Sooraj Bagal

Sooraj Bagal

Related Posts

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
Google AI Hub in India

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

October 15, 2025
microsoft 365 Office Icons 2025

मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये आता नवे आयकॉन्स!

October 4, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT
WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025
Samsung Galaxy XR

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

October 24, 2025
ChatGPT Atlas Marathi

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

October 21, 2025
MSRTC Timing Check Marathi

एस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर

September 25, 2012
मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

मराठीतून टायपिंग करायचय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग

September 10, 2012
यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

यूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे?

November 4, 2016
ADVERTISEMENT
MarathiTech - मराठीटेक

तंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट! नवं तंत्रज्ञान, नवनवे फोन्स, ॲप्स यांच्याबद्दल रंजक माहिती...

मराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा

WIndows 11 Copilot Mico Clippy

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

November 1, 2025
आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

November 1, 2025

विंडोज ११ मध्येही AI Copilot : नवा Mico आणि सोबत Clippy देईल उत्तरे!

आता मायक्रोसॉफ्ट Edge ब्राऊजरमध्ये Copilot Mode

सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट सादर : अँड्रॉईड आणि AI ची जोड

आता ChatGPT चा Atlas नावाचा स्वतःचा ब्राऊजर : गूगल क्रोमचा नवा स्पर्धक?

गूगल भारतात उभारणार मोठे AI हब : १.२५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक !

  • About
  • Advertise
  • Privacy Policy
  • Contact

© MarathiTech 2024 A Product by BagalTech

error: Content is protected!
No Result
View All Result
  • स्मार्टफोन्स
  • ॲप्स
  • टेलिकॉम
  • खास लेख
  • गेमिंग
  • ऑपरेटिंग सिस्टिम्स
  • शॉपिंग ऑफर्स
  • आमच्याबद्दल About Us
  • संपर्क – प्रतिक्रिया

© MarathiTech 2024 A Product by BagalTech