भारतात ऑनलाइन वापरात मराठी भाषिक इंटरनेट वापरकर्ते सर्वात पुढे !

डिजिटल इंडियन लँग्वेज रिपोर्टच्या यावर्षीच्या दुसऱ्या आवृत्तीमधील माहितीनुसार भारतीय भाषांमध्ये मराठी भाषिक इंटरनेट वापरकर्ते सर्वाधिक Engagement दर्शवतात! हिंदी भाषेचा वापर भारतीय इंटरनेट विश्वात सर्वाधिक असला तरी मराठी, तेलुगू, बेंगाली वापरकर्ते सर्वाधिक संलग्नता/एंगेजमेंट दाखवत असल्याचं त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे! एंगेजमेंट म्हणजे इंटरनेटवर प्रसारित केल्या जाणाऱ्या लेख, व्हिडीओ, ऑडिओ माध्यमांना वेबसाइट/अॅपवर वापरकर्त्यांकडून दिला जाणारा प्रतिसाद. (उदा. कमेंट्स, लाइक्स, शेअर्स). या अहवालात टाईप केल्या जाणाऱ्या एकूण शब्दांद्वारे ऍक्टिव्ह वापरकर्त्यांची संख्या मोजली गेली आहे.  

अहवालामधील काही ठळक मुद्दे

  • काही भाषा इतर भाषांपेक्षा जास्त संलग्नता दर्शवत आहेत ज्यामध्ये मराठी, बंगाली व तेलुगू पुढे आहेत. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्स मध्ये टॉप ७ अॅप्स मेसेजिंग व सोशल मीडिया अॅप्स आहेत! या संशोधनानुसार २२% वापरकर्ते ₹11,000 पेक्षा अधिक किंमत असलेले स्मार्टफोन्स वापरतात!
  • ५४% वापरकर्ते ₹५०००-११००० किंमतीचे फोन्स वापरतात यावरून फोन निर्मात्या कंपन्याना या वर्गातील वापरकर्त्यांच्या फोनवर फॉन्ट्स आणि भारतीय भाषांवर लक्ष देणं गरजेचं आहे हे अधोरेखित होतं 
  • मराठी आणि तेलुगू भाषा ज्या लांब शब्दांचा वापर करतात त्या डिजिटल सर्व्हिसेस आणि प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक संलग्नता दर्शवतात!  
  • इन्स्टॉल केल्या जाणाऱ्या टॉप २५ अॅप्सपैकी ४ हे ऑनलाईन शॉपिंगसाठी असल्याचं सुद्धा दिसून येत आहे. जसे कि अमॅझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम व ओएलएक्स 
  • Bodo, Dogri, Maithili, Sindhi व Santali या भाषा कमी प्रमाणात असलेल्या भाषांमध्ये सर्वाधिक संलग्नता दर्शवतात   
  • AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाला अचूक कामासाठी भारतीय भाषांना समजून घेण्याची मोठी गरज सुद्धा मांडण्यात आली आहे. 

Reverie चा डिजिटल इंडियन लँग्वेज रिपोर्ट : अधिकृत अहवाल 

गूगलच्या माहितीनुसार ५० कोटी भारतीय जून २०१८ पर्यंत ऑनलाईन येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. जवळपास ९९ टक्के भारतीय त्यांच्या स्मार्टफोनवरूनच इंटरनेटचा वापर करतात. काही दिवसांपूर्वीच गूगलच्या सर्च संमेलनात (ज्यामध्ये मराठीटेकचा सुद्धा सहभाग होता) भारतीय भाषांसाठी गूगलकडून केले जात असलेले प्रयत्न मांडले होते. इंग्लिश व हिंदी नंतर आता इतर भाषिकांना समोर ठेऊन मोठ्या कंपन्या कन्टेन्ट तयार करण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे भारतीय भाषांना चांगलं चित्र निर्माण होताना दिसत आहे.

search terms marathi internet users with most engagement among Indian languages ahead of Hindi, Telugu, Bengali

Exit mobile version