गोरीला ग्लास ६ सादर : अधिक मजबूत आणि टिकाऊ

कोर्निंग कंपनीने गोरीला ग्लास सादर केल्यावर दोन वर्षानंतर नवा गोरीला ग्लास सादर केला असून ही नवी काच स्मार्टफोन्ससाठी अधिक मजबूत आणि टिकाऊ असेल असा दावा कंपनीने केला आहे. हल्लीच्या जवळपास सर्वच फोन्समध्ये गोरीला ग्लासचा समावेश असतो. फोन पडला की फुटला आणि मग डिस्प्ले बदलण्याच्या गोष्टी सुरु असा त्रास गोरीला ग्लास मुळे कमी होतो.

Gorilla Glass 6  मध्ये अशा अनेक सुधारणांचा समावेश आहे ज्या या नव्या काचेला अधिक टिकाऊ बनवतील. यावेळी पडल्यावर धक्का बसून होणारं नुकसान कमी होईल अशा पद्धतीने याची बांधणी केल्याचं कॉर्निंगकडून सांगण्यात आलं आहे. यापूर्वी केवळ स्क्रॅच कमी पडतील हा मुख्य उद्देश असायचा. त्यामुळे काही फोन्स गोरीला ग्लास असूनही डिस्प्ले फुटल्याची उदाहरणे पाहिली असतील… आता त्यामध्ये घट होण्याची अपेक्षा आहे.

कंपनीच्या चाचण्यांनुसार नव्या काचेने १ मीटर अंतरावरील १५ वेळा फोन ड्रॉप सहन केले असल्याच सांगण्यात आलं ही गोरीला ग्लास ५ च्या तुलनेत दुप्पट चांगली कामगिरी होती.

गोरीला ग्लास सध्या तब्बल ६०० कोटी फोन्सवर जोडलेली आहे!

वियरेबल प्रकारच्या म्हणजे स्मार्ट घड्याळे, फिटनेस ट्रॅकर सारख्या उपकरणांसाठीसुद्धा नवी मालिका सादर करण्यात आली आहे. Gorilla Glass DX and DX+ जे गोरीला ग्लास आणि सफायर ग्लास उत्कृष्ट गुणवत्ततेसाठी या दोघांच्या सोयी देईल.  अधिकृत माहिती

search terms : corning gorilla glass 6 marathi phone display

Exit mobile version