इंटरनेट स्पीड पाहण्याची साईट fast.com वर नव्या सोयी !

जवळपास दोन वर्षांपूर्वी Netflix या व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्विस देणार्‍या कंपनीने Fast.com ही वेबसाइट सादर केली ज्यावरून आपण अगदी सोप्या पद्धतीने आपले इंटरनेट कनेक्शन स्पीड पाहू शकतो . अगदी स्मार्टफोनवर सुद्धा ब्राउजरमध्ये स्पीड पाहता येतो अॅपशिवाय…! याच वेबसाइटवर आता आपल्याला डाऊनलोड स्पीड बरोबरच अपलोड स्पीड आणि Latency सुद्धा पाहता येणार आहे.

अपलोड स्पीड हा इंटरनेट कनेक्शनचा आपल्या डिवाइसवरून इंटरनेटवर डाटा अपलोड करण्यासाठीचा वेग. तर Latency म्हणजे आपल्या डिवाइस वरून डाटा एखाद्या सर्व्हरवर जाऊन परत येण्यासाठी लागणारा वेळ. हा वेळ Loaded आणि Unloaded कनेक्शन अशा दोन्ही वेळेस मोजला जाईल. आपल्या नेटवर्कवर कोणतेही ट्रॅफिक नसेल तेव्हा डाटा परत येण्याचा वेग हा Unloaded Latency तर आपल्या नेटवर्कवर जेव्हा खूप ट्रॅफिक असेल म्हणजेच जेव्हा आणखी कोणीतरी चित्रपट पाहण्यासाठी, डाऊनलोड किंवा अपलोड करण्यासाठी अशा जास्त डाटा लागणार्‍या कारणांसाठी इंटरनेट वापरत असेल तेव्हाचा वेग म्हणजेच Loaded Latency.

समजा तुम्ही ऑनलाइन गेम खेळत आहात किंवा व्हिडीओ कॉल करत आहात आणि अशा वेळेस फक्त तुम्हीच इंटरनेट वापरत असाल तर आपला वेग हा Unloaded Latency चा असेल परंतु आपल्या नेटवर्कवर आणखी वापरकरर्ते असतील तर अशा वेळेस आपला वेग हा Loaded Latency चा असेल. साधारणता Loaded आणि Unloaded Latency सारख्या असाव्यात परंतु जर Loaded Latency जास्त असेल तर आपणास खराब अनुभव येऊ शकतो म्हणजेच गेम खेळताना उशिराने हालचाली होणे वगेरे किंवा व्हिडीओ कॉलिंगमध्ये व्यत्यय येणे.

Fast.com वर आत्तापर्यंत जवळपास पन्नास कोटी स्पीड टेस्ट झाल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यातील अर्ध्या तर डिसेंबर 2017 ते जून 2018 या कालावधीत पार पडल्या आहेत.

अधिक माहितीसाठी Netflix Media Centre 

आपण fast.com बरोबरच www.speedtest.net यांसारख्या वेबसाइट द्वारे आपल्या इंटरनेटचा वेग पाहू शकता आणि याबद्दल समाधानकारक वेग नसेल तर आपल्या ISP (Internet Service Provider) ला विचारूही शकता.

Exit mobile version