१४ ऑगस्टपासून ईबे इंडिया होणार बंद : फ्लिपकार्टचा निर्णय!

विविध प्रकारच्या वस्तू, नवीन गोष्टींबरोबरच Refurbished आणि जुन्या वस्तू विकत घेण्यासाठी प्रसिद्ध असणारी Ebay India ही ई कॉमर्स साइट १४ ऑगस्ट २०१८ पासून बंद होत आहे. मागील वर्षी ईबेने आपले भारतीय युनिट ebay.in हे फ्लिपकार्टला विकले होते. त्यामुळेच सद्यस्थितीत ईबे इंडिया फ्लिपकार्टच्या अधिपत्याखाली आहे.  फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांनी ई-मेलद्वारे याबाबत माहिती दिली.

ईबे आता १४ ऑगस्ट २०१८ पासून कोणतीही नवीन ऑर्डर स्वीकारणार नाही. तसेच विक्रेते सुद्धा ३१ जुलै पर्यंतच त्यांच्या वस्तू ईबे इंडियावर विकण्यासाठी ठेऊशकतील. त्यानंतर त्यांना एक तर ebay.com किंवा फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर त्यांच्या वस्तू विकण्यासाठी ठेवाव्या लागतील.

समजा तुम्ही ebay.in वरून काही वस्तू विकत घेतल्या असतील आणि त्यांच्या नोंदी व पावत्या हव्या असतील तर त्या  My PaisaPay आणि My eBay वर पुढील नोटीस येईपर्यंत उपलब्ध असतील.

त्याचबरोबर ईबे इंडिया बंद केल्यानंतर फ्लिपकार्ट ग्रुप एक नवीन वेबसाइट सादर करणार आहे यामध्ये आणखी काही नवीन गोष्टी सुद्धा उपलब्ध असतील. या नव्या प्लॅटफॉर्मवर रिफर्बिश्ड (म्हणजे जुन्या वस्तूंची डागडुजी करून नव्याने वॉरंटीसह विकणे) ईबे इंडिया भारतात विविध कारणांमुळे यशस्वी होऊ शकली नाही मात्र आजही बऱ्याच वस्तू अशा आहेत ज्या अमॅझॉन किंवा फ्लिपकार्टवर मिळत नाहीत पण ईबेवर मिळतात. स्मार्टफोन एक्सक्लूसिव्ह ज्यामध्ये फ्लिपकार्ट आणि अमॅझॉनने बाजी मारली तिथे ईबे प्रामुख्याने कमी पडली.          

search terms Flipkart shutting down eBay India launch new platform for selling refurbished goods
Exit mobile version