निकॉनचा सुपरझुम कॅमेरा Coolpix P1000 : 125x Optical Zoom व 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग

Nikon Coolpix P1000

निकॉन या कॅमेरा क्षेत्रातील कंपनीने त्यांच्या सुपर कॅमेरा मालिकेमध्ये नव्या Coolpix P1000 ची जोड दिली असून सध्याच्या सर्व सुपरझुम कॅमेरापेक्षा यामध्ये झुम सर्वाधिक आहे. 3000mm Optical Zoom आणि तेसुद्धा
फुल झुम असताना 4K Ultra HD व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येईल! यामुळे चक्क चंद्रापर्यंतच्या अंतराचे फोटो सहज काढता येतात (RAW उपलब्ध) आणि त्याचा व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड करता येतो! यामध्ये 16 MP Low-light CMOS Sensor असून 125x Zoom असलेली NIKKOR ED Glass Lens आहे. 3.2″921,000-dot Vari-Angle LCD डिस्प्ले आणि 4K UHD 3840 x 2160 at 30/25fps मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगची सोय…! या कॅमेराची किंमत $1000 (~₹६९,०००) इतकी आहे.

सुपरझुम कॅमेरा लांब अंतरापर्यंतचे फोटो काढू शकत असले तरी यांच्या मध्ये असलेल्या सेन्सरचा आकार DSLR किंवा मिररलेस कॅमेरांच्या मानाने कमी असतो त्यामुळे फोटोची गुणवत्ता तेव्हढ्या प्रतीची नसतेच. ज्यांना लेन्स घेणं, बदलणं, प्रवासात घेऊन जाणं शक्य नाही त्यांनाच कमी किंमतीत अधिक झुम करता येणारे सुपरझुम/मेगाकझुम कॅमेरा उत्तम आहे.

निकॉन Coolpix P1000 : Nikon Coolpix P1000 Specs :
Sensor Size : 1 / 2.3  in
Image Size (pixels) : 4608 x 3456 (16M)
Lens : 125x optical Zoom-NIKKOR ED glass lens
Lens f/-number f/2.8-8
ISO Sensitivity ISO  100   – 1600 ISO 3200, 6400
Shutter Speed 1/4000 – 1 sec : 1/4000 – 30 sec. (when ISO sensitivity is 100 in M mode)
 Continuous Shooting Speed : approx.  7  frames per second
3000mm optical zoom
4K Ultra HD video with HDMI out, stereo sound and an accessory hot-shoe
Dual Detect image stabilization
RAW (NRW), time-lapse and Superlapse shooting plus great creative modes
Full manual controls along with easy auto shooting

Exit mobile version