SSD म्हणजे काय? हार्डडिस्क ऐवजी एसएसडी वापरण्याचे फायदे

नवीन पीसी/लॅपटॉप  किंवा स्टोरेज डिवाइस घेताना आपल्यासमोर Hard Disk Drive (HDD) सोबतच Solid State Drive (SSD) चा नवा पर्याय उपलब्ध आहे परंतु खूप कमी लोकांना याबादल माहिती असते व त्यामुळे SSD चा विचार केला जात नाही. त्यामुळेच या लेखामध्ये आपण SSD म्हणजे काय? व त्याचे फायदे आणि तोटे याबद्दल माहिती घेऊया…

HDD आणि SSD दोन्हीही ऑपरेटिंग सिस्टम, अॅप्लिकेशन तसेच आपला डेटा स्टोरेज करण्यासाठी वापरल्या जातात परंतु SSD मध्ये हार्ड डिस्क प्रमाणे फिरते भाग नसतात तर त्यामध्ये फ्लॅश मेमरीचा केलेला असतो.
हार्ड डिस्कमध्ये चक्राकार भाग फिरत असतात त्यांचा येणारा आवाज सुद्धा तुम्ही ऐकला असेल.
एसएसडीमध्ये मात्र भाग बोर्डवर बसवलेले असतात जसे की आपण खालील इमेजमध्ये पाहू शकता .

SSD आणि HDD मधील अंतर्गत भाग (Internal Parts)

SSD चा वापर का करावा आणि त्याचे फायदे : SSD वापरण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यामुळे मिळणारा वेग. SSD ही HDD पेक्षा कितीतरी पटीने वेगाने काम करते त्यामुळेच त्याचा उपयोग लवकर पीसी/लॅपटॉप बूट (चालू) करणे यासाठी होतो. जिथे HDD वर एखादा मिनीट जातो त्याच ठिकाणी SSD अगदी काही सेकंदात हे काम पार पडते. एवढेच नव्हे तर आपण इंस्टॉल केलेले अॅप्लिकेशन / गेम्स लवकर चालू होण्यास व परफॉर्मेंस सुधारण्यास SSD चा उपयोग होतो. SSD मध्ये फॉटोशॉप, ऑफिस, मोठे अॅप्स/गेम्स हे HDD च्या तुलनेत खूपच लवकर चालू तर होतातच शिवाय वापर करताना ही वेग वाढण्यास मदत होते.

HDD प्रमाणे SSD मध्ये डिस्क आणि फिरणारा पार्ट नसल्यामुळे प्रवासामध्ये किंवा इतर वेळेस HDD चालू असताना धक्का बसल्यास जिथे HDD डॅमेज होऊ शकते त्याच ठिकाणी SSD फायद्याची ठरते व अशा वेळेस सुद्धा SSD सुरक्षित राहते. त्याचबरोबर HDD प्रमाणे SSD थोडासुद्धा आवाज करत नाही. HDD च्या तुलनेत SSD कमी पॉवर वापरते त्यामुळे लॅपटॉप मध्ये बॅटरीचा वापर कमी होतो. SSD ही HDD पेक्षा लहान तसेच वजन खूपच कमी असल्याने पीसी/लॅपटॉप मध्ये खूपच कमी जागा घेते.
आता तर आणखी मकमी आकाराच्या NVMe M.2 SSD उपलब्ध झाल्या आहेत ज्या नवी लॅपटॉप/पीसीच्या मदरबोर्डवरच लावता येतात…! 

NVMe NAND SSD
Feature HDD SSD
स्टोरेज क्षमता डेस्कटॉपसाठी 10TB+ पर्यंत (सामान्य वापरासाठी) डेस्कटॉपसाठी 4TB+ पर्यंत (सामान्य वापरासाठी)
ओएस Boot Time ३० ते ४० सेकंद १० ते १३ सेकंद
चुंबकीय परिणाम चुंबकामुळे डाटा पुसला जाऊ शकतो काही परिणाम नाही
वेग SSD पेक्षा खूप कमी HDD पेक्षा जवळपास ३०% जास्तच
लागणारी पॉवर 10W ~2W
किंमत ४००० रुपयात 1024GB(किंमत कमी) 240GB साठी ४५०० पासून (किंमत जास्त)
SSD Caddy for Laptop

तुमच्या सध्याच्या लॅपटॉपमध्ये Caddy चा वापर करून ती DVD-ROM च्या जागी बसवू ही शकता जेणेकरून कामगिरी आणि वेग सुधारेल. ही कॅडी २००-३०० रुपयात मिळते. DVD ड्राइव्ह काढून तिथे तुमची HDD लावून HDD च्या जागी SSD लावू शकता. यामुळे अगदी जुने लॅपटॉपसुद्धा चांगली कामगिरी करू लागतात. ऑपरेटिंग सिस्टिम SSD वर आणि बाकी सर्व डेटा HDD वर ठेवायचा  

SSD चे काही तोटे : SSD ही HDD पेक्षा काही पटींनी महाग असते. उदाहरणच घ्यायचं झाल तर 120GB SSD जवळपास ₹२५००-३००० पर्यंत जाते तर 1TB HDD ₹३५००-४००० पर्यंत…!
HDD च्या तुलनेत SSD चे आयुर्मान कमी कारण दरवेळेस नवीन माहिती भरताना आधीची पुसून टाकावी लागते, या प्रक्रियेमध्ये काही सेल्स डॅमेज होऊ शकतात (याचा अर्थ आपला डेटा जातो असा नव्हे तर आपला डेटा दुसर्‍या सेल्स मध्ये साठवला जातो) परंतु SSD आपल्या पीसी/लॅपटॉपच्या वापरापर्यंत तर सहजच टिकते.

जर आपणाला आपल्या पीसी/लॅपटॉप वर स्वस्तात चांगली कामगिरी व  वेग हवा आहे तर तुम्ही 120GB SSD घेऊन त्यावर ऑपरेटिंग सिस्टम इंस्टॉल करू शकता आणि आपल्या फाइल/डेटा साठविण्यासाठी नेहमीची HDD वापरु शकता. 120GB WD Green SSD लिंक – Amazon / फ्लिपकार्ट

search terms : what is ssd in marathi solid state drive hard disk ssd vs hdd

Exit mobile version